क्राईम ताज्या बातम्या

पेट्रोल पंप शुल्क भरण्यासाठी लाचेची मागणी…..लाचखोर आरोपी ताब्यात….लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई…..

पेट्रोल पंप शुल्क भरण्यासाठी लाचेची मागणी…..लाचखोर आरोपी ताब्यात….लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई…..



‎नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी पोलीस ठाणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई करीत ​२८ एप्रिल रोजी
‎वणी विभागातील वैध मापनशास्त्र निरीक्षक भगवान प्रल्हाद डोल्हारे यांना ताब्यात घेतले.
‎वणी विभाग, दिंडोरी, नाशिक येथील ​तक्रारदार यांनी त्यांच्या पेट्रोल पंपाच्या पडताळणीसाठी शासकीय शुल्काचा भरणा करून ऑनलाईन अर्ज केला होता. या अर्जाच्या अनुषंगाने पेट्रोल पंपाची पाहणी करून पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी आरोपी संशयित भगवान डोल्हारे यांनी शासकीय शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी केली.​ प्रति नोझल सहा हजार रुपये असे
‎​एकूण ४ नोझलचे २४ हजार रुपये मागणी केली होती. ​सदर लाचेची रक्कम स्वीकारताना आरोपीला रंगेहात पकडण्यात आले असून भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ​सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी कोणताही शासकीय लोकसेवक शासकीय कामासाठी लाचेची मागणी करत असेल, तर तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *