गोविंदा फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम….. एकलहरे एनटीपीएस एक्सपोर्ट क्लबच्या व्हॉलीबॉल खेळाडूंना गणवेश वाटप….
गोविंदा फाउंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एकलहरे येथील एनटीपीएस एक्सपोर्ट क्लबच्या व्हॉलीबॉल खेळाडूंना गणवेश वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. खेळाडूंना प्रोत्साहन देणे, त्यांच्यात सांघिक भावना निर्माण करणे आणि क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी त्यांना पाठबळ देणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
या कार्यक्रमाला मुख्याध्यापक वाघ सर, मार्गदर्शक मनोजजी मस्के, गोविंदा फाउंडेशनचे संचालक अभिषेक सुखदेव वाराडे आणि कार्याध्यक्ष रोशनजी माळी यांची उपस्थिती होती.यावेळी मुख्याध्यापक वाघ सर यांच्या हस्ते अभिषेक सुखदेव वाराडे यांचा सत्कार करण्यात आला. खेळाडूंना गणवेश मिळाल्याने त्यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. क्रीडा क्षेत्रातील तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी गोविंदा फाउंडेशनने पुढाकार घेतल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

या उपक्रमासाठी मिथुन राठोड, प्रवीण किंगरे, शंकरशाली, मुकेश सपकाळ, गणेश काजळे, निलेश पवार आणि शैलेश पवार यांनी सहकार्य केले.
गोविंदा फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे स्थानिक व्हॉलीबॉल खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले असून, अशा सामाजिक व क्रीडापूरक उपक्रमांमुळे युवकांमध्ये खेळाची आवड वाढण्यास मदत होणार आहे.





