भोंसला गर्ल्स’च्या पाइप बँडचे यश…..
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित ‘भोंसला मिलिटरी स्कूल गर्ल्स’च्या पाइप बँडने शालेय मिलिटरी बँडच्या विविध स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे. भोंसला मिलिटरी स्कूल गर्ल्सच्या कमांडंट मेजर सपना शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थिनींने हे यश मिळविले.
पुण्यातील बालेवाडी स्टेडियम येथे
झालेल्या महाराष्ट्र राज्य शालेय मिलिटरी बँड स्पर्धेत, भोंसला गर्ल्स स्कूलच्या पाइप बँडने मुले व मुलींचे ७२ संघांवर विजय मिळवून पाइप बैंड (मुलींच्या) गटात प्रथम क्रमांक पटकावला. महाराष्ट्रातील सर्वोत्तम मुलींचा पाइप बँड हा सन्मान त्यांना मिळाला आहे. त्यानंतर २५ नोव्हेंबरला मध्य प्रदेशातील भोपाळ येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत या शाळेच्या संघाने पुन्हा गुणवत्ता सिद्ध केली आणि राष्ट्रीय स्तरावरील बँड स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. देशातील सर्वोत्तम बँडपैकी एक ठरलेल्या या बँडला दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होण्याची संधी मिळण्याची शक्यता असल्याचे शाळेमार्फत सांगण्यात आले.