क्राईम ताज्या बातम्या

गावठी कट्टा बाळगणा-याला नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने अटक केली

गावठी कट्टा बाळगणा-याला नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने अटक केली

 

नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने गावठी कट्टा बाळगणा-या सराईत गुन्हेगारास अटक केली आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्यातील गुन्हेशोध पथकाचे अजय देशमुख यांना सराईत गुन्हेगार संदेश विष्णु वाघ हा पिस्टल सारखे हत्यार घेवुन वालदेवी पुलाजवळ, पाटील नर्सरी रोडवर फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने नर्सरी रोडवर संशयिताला ताब्यात घेतले.

सदर सुचना प्रमाणे गुन्हेशोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वालदेवी पुलाजवळ, पाटील नर्सरी रोडवर साध्या वेशात जावुन सापळा रचला होता, सदर ठिकाणी रेकॉडवरील इसम संशयित संदेश विष्णु वाघ पळून जात असताना त्याला ताब्यात घेतले.

संशयिताकडे एक देशी बनावटीचे पिस्टल (कटटा) मॅग्झीन असा एकुण २५,०००/- रू. किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपीताला ताब्यात घेतले व गुन्हेशोध पथकाचे अजय देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादी वरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात कलम ३/२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलिस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण सुर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक किरण कोरडे तसेच गुन्हेशोध पथकाचे टेमगर, विष्णु गोसावी, नाना पानसरे, जाधव, केतन कोकाटे, अजय देशमुख, भाऊसाहेब नागरे, सागर आडणे, गोकुळ कासार, रोहित शिंदे, योगेश रानडे आदींनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *