क्राईम ताज्या बातम्या

महात्मा फुले नगर खारीफाटा येथे दुकाने फोडून ४० हजाराची रोकड चोरट्याने केली लंपास

महात्मा फुले नगर खारीफाटा येथे दुकाने फोडून ४० हजाराची रोकड चोरट्याने केली लंपास

 


देवळा तालूक्यातील खारीफाटा येथे मध्ये रात्रीच्या सुमारास ३ ते ४ दुकाने टामी च्या साह्याने पत्रे उचकवत चोरट्यांनी ४० हजार रुपयांची रक्कम लंपास केली. चोरीचा प्रकार ३० जुलै च्या रात्री खारीफाटा भागात घडला असून याप्रकरणी देवळा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


गेल्या पंधरा दिवसांपूर्वी धोबी घाट येथे गुंजाळ चहा दुकानावर चोरी झाली होती याचाही तपास पोलिसांना लागला नाही यानंतर लगेच खारी पाडा येते चोरी झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे.
याप्रकरणी रोशन शिरसाठ यांचे शेतकरी आमृत तुल्य व आडत दुकानाच्या ड्राँव्हर मधून २० हजार, आमोल सोनवणे गुरूकृपा टँक्टर गँरेज मधून ५ हजार, किरण सोनजे यांच्या कृषीे स्वराज्य दुकानातून १२ ते १४ हजार आणि काही साहीत्य चोरीस गेले असून त्यांनी सदर घटनेची तक्रार देवळा पोलीसात केली आहे.

रात्री दहा वाजता दुकान बंद करून घरी गेल्यानंतर रवीवारी सकाळी ह्या चोरीच्या प्रकरणाची घटना उघडकीस आली दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे पत्रे उचकवून आत घुसून एकूण ३५ ते ४० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे
सदर या परीसरात ८ दिवसापुवी हि चोरी झाली असुन गुन्हेगाराना पोलिसांचा धाक राहीला नसून परीसरात व व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. देवळा पोलीसानी ह्या गोष्टी कडे कटक्षाने लक्ष देउन रात्री गस्त वाढवावी व लवकरात लवकर चोरट्याचा छडा लावून अटक करावी अशी जोरदार मागणी परीसरातून नागरिक करीत आहे. तक्रारीवरून देवळा पोलिस ठाण्याचे उप निरीक्षक कचरे व मोरे यांनी घटनास्थळी पोहचून परीस्थितीची पहाणी करुन पंचनामा केला असून पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
दहिवड प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *