ताज्या बातम्या महाराष्ट्र

गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद निमित्त नाशिकरोडला रूट मार्च

गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद निमित्त नाशिकरोडला रूट मार्च…..

श्री गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद निमित्ताने नाशिकरोड भागात रूट मार्च काढण्यात आले. शहरात येणाऱ्या काळात विविध धार्मिक सण साजरे होणार आहेत. नागरिकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा, शांतता राहावी आणि गुन्हेगारांवर वाचक यासाठी बुधवार 11 सप्टेंबर रोजी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बिटको चौक ते महात्मा गांधी पुतळा देवळाली गाव ते छत्रपती मैदान देवळाली गाव पर्यंत पोलिसांनी रूट मार्च काढले.


रूट मार्च पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपायुक्त मोनिका राउत यांचा मार्गदर्शनाखाली करण्यात आले. रूट मार्च मध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक गिरी, पोलिस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे, पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे व उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या सह 10 एपीआय, पीएसआय, आरसीपी पथकाचे 20 पोलिस अमलदार, एस आर पी एफ प्लटून 01, अधिकारी 20, पोलिस अमलदार व 45 पोलिस अमलदार आणि 50 होमगार्ड असे सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *