Homeक्राईमदरोडा, खुनाचा प्रयत्न आणि वाहनांची तोडफोड करणा-या आरोपींच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई..........
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

दरोडा, खुनाचा प्रयत्न आणि वाहनांची तोडफोड करणा-या आरोपींच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई……. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी घेतली गंभीर दाखल

दरोडा, खुनाचा प्रयत्न आणि वाहनांची तोडफोड करणा-या आरोपींच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई……. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी घेतली गंभीर दाखल…….

नाशिक रोड भागातील उपनगर पोलिस ठाणे हद्दीतील विहितगाव धोंगडे मळा याठिकाणी वाहनांची तोडफोड करत हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त यांनी गंभीर दखल घेत दरोडा, खुनाचा प्रयत्न आणि वाहनांची तोडफोड करणा-या गुन्हेगारांच्या टोळीतील गुन्हयातील आरोपींच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली.मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्याचे २९ जुलै रोजी आयुक्तांनी आदेश निर्गमीत करून जनजिवन विस्कळीत करणा-या आरोपींविरुद्ध कठोर कारवाईचे पावले उचलण्यात आली आहेत.

२४ जुलै रोजी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत – गुन्हयातील आरोपी यांनी संगनमत करून फिर्यादी यांना जिवे मारण्याची धमकी व मारहाण करून बळजबरीने फिर्यादीचे खिशातील पैसे काढुन घेवुन व आरोपिंनी हातातील धारधार शस्त्राने फिर्यादीस जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच आरोपिंनी त्यांचे हातातील धारधार शस्त्राने इतर नागरीकांच्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडुन नुकसान करून परिसरात दहशत निर्माण केल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाणे येथे वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासात गुन्हयातील मुख्य आरोपी व गुन्हेगारी टोळीचा सुत्रधार बाशी उर्फ शिवम उर्फ शुभम हरबिर बेहनवाल रा. फर्नांडीसवाडी, जयभवानी रोड नाशिक हा गुंड प्रवृत्तीचा असुन त्याने त्याचे साथीदार नेम्या उर्फ रोशन रामदास पवार, अमन सुरज वर्मा, भैयु उर्फ सत्यम संजित ढेनवाल, रोहन राठोड उर्फ पियुष शैलेंद्र खोडे, सुधांशु उर्फ सोनु राजेश बेद, मोहिज जावेद शेख, मोहिज जावेद शेख तसेच दोन फरार आरोपी असे एकुण ०९ आरोपिंनी सोबत मिळुन गुन्हेगारी टोळी निर्माण करून संघटीत रित्या घातक हत्यारे जवळ ठेवून नाशिक शहरातील उपनगर, नाशिकरोड, इंदिरानगर, अंबड, गंगापुर इ. पोलीस ठाणे हददीत लोकांना अवैधरित्या शस्त्र बाळगुन धमकावुन मारहाण करणे, खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, दरोडा टाकुन लोकांची लुटमार मारणे, जबरी चोरी करणे, जबरी चोरी करतांना दुखापत करणे, घरफोडी चोरी, अनाधिकृतपणे प्रवेश करणे, खंडणी मागणे या प्रकारे परिसरात दहशत निर्माण केली होती.

टोळीचा प्रमुख मुख्य आरोपी बाशी उर्फ शिवम उर्फ शुभम हरबिर बेहनवाल याने गुन्हा करतांना टोळीतील सदस्यांच्या सहाय्याने हिंसाचाराचा, अवैध शस्त्रांचा वापर करून धाकदपटशा दाखवुन आर्थीक फायदयासाठी परिसरात वर्चस्व निर्माण करून खंडणी वसुल करणे याप्रकारे बेकायदेशीर कृत्य चालु ठेवले. टोळीतील सदस्यांविरूध्द एकुण २५ गुन्हे उपनगर, नाशिकरोड, इंदिरानगर, अंबड, गंगापुर पोलीस ठाणे अंतर्गंत दाखल झालेले आहेत. गुन्हयातील टोळी प्रमुख व सदस्य यांनी नियोजीतबध्द कट रचुन गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झालेले असुन त्यांनी संघटीत रित्या गुन्हा केला असल्याने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गुन्हयातील आरोपींविरूध्द कठोर कारवाई करत मोक्का कायदयाअंतर्गत ठोस कारवाई केली आहे.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आरोपींनी नाशिक शहरात सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होईल असे गुन्हेगारी कृत्य व गुन्हे करुन सर्वसामान्य जनतेचे जनजिवन | विस्कळीत केल्याने नाशिक शहरातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधीत राहावी यासाठी मोक्का कायदयान्वये ठोस प्रतिबंधक कार्यवाही केल्यामुळे नाशिक शहरातील नागरीकांनी झालेल्या कार्यवाही बाबत समाधान व्यक्त केले आहे.

पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतून सर्व पोलीस ठाणे हददीत चौक सभा घेवुन नागरीकांच्या समस्या जाणुन घेण्यात येत असून तसेच गुन्हेगारी वृत्तीच्या इसमांची माहिती घेवुन नाशिक शहरातील जनजिवन विस्कळीत करणा-या व समाजस्वास्थ बिघडविणा-या गुन्हेगारांवर मोक्का / एमपीडीए कायदयाच्या तरतुदीनुसार प्रभावीपणे प्रतिबंधक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरुच राहणार असल्याचे सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments