ICICI बँकेच्या लॉकर मधून २२२ खातेदारांचे पाच कोटी रुपयांचे दागिने गायब…… घटना सीसीटीव्ही मध्ये कैद……
आपण आपले दागिने लॉकरमध्ये ठेवणार असाल तर सावधान…. नाशिक मध्ये आयसीआयसीआय होम फायनान्स या उच्चभ्रू लॉकर मधून 222 खातेदारांचे दागिने गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन अज्ञात चोरट्यांनी ऑफीसमध्ये ठेवलेल्या सेप्टी लॉकरच्या चाव्या तेथील ऑफीसमधून प्राप्त करून लॉक असलेल्या सेप्टी लॉकर उघडून ग्राहकांचे सेफमध्ये ठेवलेले पाच कोटी रुपयांचे सोन्याचे दागीने चोरी करुन नेले आहे. ४ मे रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात दोन चोरट्यांनी २२२ खातेदारांच्या एकूण ५ कोटी रुपयांचे १३३८५ ग्राम दागिने चोरून नेले. गायब झालेल्या दागिन्यांची किंमत जवळपास पाच कोटी रुपयांच्या दरम्यान असून सदरची संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.
नाशिक शहरातील डोंगरे वस्तीगृह चौकामध्ये तिसऱ्या मजल्यावर 24 तास रहदारी असलेल्या रस्त्यावर ही कंपनी आहे या धक्कादायक घटनेने खाजगी बँका खाजगी लॉकर्स आणि त्यांची सुरक्षा ऐरणीवर आल्याचं समोर आले आहे. जयेश कृष्णदास गुजराथी यांच्या फि्यादीवरून सरकार वाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत