बिटको महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन…मार्केटमधील गरज ओळखून व्यक्तिमत्व विकास साधून कौशल्ये प्राप्त करा… उद्योजक हर्षद बेळे
नाशिकरोड : ” स्वप्ने जरूर बघा पण आपल्याला मोठा अधिकारी क्लास वन बनायचे, आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्याचे त्यासाठी २४ तासांचे स्लॉट बनवून आपल्याला मिळालेला प्राईम टाईमाचा उपयोग सध्या आपण काय करतो आणि काय करायचे, नोकरी करण्यापेक्षा आपल्या जवळील ज्ञान, तंत्र व अनुभव घेऊन त्या कौशल्याचा उपयोग करून एखादा व्यवसाय आपण करू शकतो काय ? नक्की याचा विचार करा. ‘ द सीक्रेट ‘ ही डॉक्युमेंटरी बघा, ‘ मना सज्जना ‘ हे पुस्तक वाचा. जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, ” असे आयमाचे संचालक व सचिव- उद्योजक हर्षद बेळे यांनी केले.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात वाणिज्य विभागावतीने आयोजित वाणिज्य मंडळाचे उद्घाटन कार्यक्रम सेमिनार हॉलमध्ये संपन्न झाला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रणाली पाथरे, पर्यवेक्षिका राधा पाटील, संयोजिका शालिनी शेळके, लता चिकोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी उपप्राचार्या प्रणाली पाथरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी उद्योजक हर्षद बेळे यांनी विद्यार्थ्यांना उद्योग तंत्र, संशोधनात सहकार्य करण्याचे आश्वासन देत प्रेरणादायी मार्गदर्शन करून महाविद्यालयासोबत एमओयू करार केला. प्रमुख प्रमुख पाहुण्यांचा परिचय लता चिकोडे मॅडम यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालिनी शेळके यांनी केले तर आभार शुभांगी पाटील यांनी मानले. तंत्रसाह्य राहुल पाटील यांनी केले. कार्यक्रमास वाणिज्य शाखेतील शिक्षक व २२० विद्यार्थी उपस्थित होते.