ताज्या बातम्या धार्मिक

सिंधी समाज करणार ५०१ बहराना साहिब पूजा महायज्ञ……

 

सिंधी समाज करणार ५०१ बहराना साहिब पूजा महायज्ञ……

नाशिक येथे सिंधी समाज करणार ५०१ बहराना साहिब पूजा महायज्ञ चे आयोजन. नाशिकमध्ये प्रथमच बहराना साहेब पूजा महायज्ञाचे रविवारी २६ जानेवारी रोजी भव्य आयोजन करण्यात आले आहे. महायज्ञ मध्ये शहजादे साई ओमीराम आणि शहजादे लालसाई दास यांची विशेष उपस्थिती असणार आहे.


महायज्ञ मध्ये सहभाग होण्यासाठी सिंधी समाज बांधवांनी २० जानेवारी पर्यंत नावनोंदणी करून मोठ्या संख्येने भाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पवित्र गोदावरी नदी किनारी असलेले श्रध्दा लॉन्स येथे भाविकांच्या हस्ते बहराना साहेब पूजा होणार आहे.

बहराना साहेब साठी लागणारे साहित्य भाविकांना तयार करून दिले जाणार आहे तसेच पूजेचे थाळ प्लेट आणि सिंधी गोल टोपी भेट दिली जाईल. सर्व परिवारांकडून एकत्र सामूहिक पूजा करण्यात येणार आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे यूट्यूब वर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. भाविकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.

पुज्य नासिक डिस्ट्रिक्ट सिंधी पंचायत फेडरेशन
पुज्य नासिक सिंधी पंचायत पुज्य स्वामी शांतीप्रकाश पंचवटी सिंधी पंचायत पुज्य उपनगर सिंधी पंचायत पुज्य छापरु सिंधी पंचायत नासिक रोड पुज्य देवलाली कॅम्प सिंधी पंचायत
पुज्य सिंधी सरवी संगत भारतीय सिंधु सभा नासिक ग्रुप पुज्य चालीयो साहब सेवा मंडल पंचवटी
पुज्य लाल साई सिंधी सेवा मंडळ नासिक रोड
पुज्य दरयाशाह संगत ट्रस्ट देवलाली कॅम्प
पुज्य शिवशक्ती ग्रुप नासिक पुज्य लाल साई सेवा ग्रुप नासिक पुज्य होलाराम कॉलनी ग्रुप
युनायटेड सिंधी युथ फाऊंडेशन नासिक सिंधी सोशल ग्रुप सोशल सिंधी लेडिज ग्रुप चे सहकार्य लाभले आहे.

ज्या भाविकांना बहराना साहेब पूजा मध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांनी पंचवटी नाशिक साठी ममता तोलानी 9767116375, नाशिकरोड प्रिया साधवानी 9309784931, आणि देवळाली कॅम्प साठी देवी दीदी लखमियानी 9822520363 यांच्याकडे पूजेसाठी नावनोंदणी करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *