सिंधू सागर अकॅडमी अमृतमहोत्सव : वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न…… सिंधी शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून कलाविष्कार……. वार्षिक स्नेहसंमेलनात कलागुणांचे सादरीकरण
नाशिक सिंधी शिक्षण मंडळाच्या सिंधूसागर अकॅडमी आणि आर. के. कलानी कनिष्ठ महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शुक्रवारी १० जानेवारी रोजी संपन्न झाले. भाभानगरातील दादासाहेब गायकवाड सभागृहात सायंकाळी झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी कलागुणांचे सादरीकरण केले. स्नेहसंमेलनाचे उद्घघाटन ज्येष्ठ अधिवक्ता व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी अध्यक्ष अॅड. जयंत जायभावे यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमप्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
संस्थेची अमृत महोत्सवापर्यंतची वाटचाल कौतुकास्पद आहे. अनेक विद्यार्थी घडविताना संस्थेने उत्तरोत्तर प्रगती साधावी. तसेच आगामी काळात संस्थेचा नावलौकिक आणखी वाढेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन झाले.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने करून उत्सवाला शुभ सूर देण्यात आला. ‘अतुल्य भारत’ ही यावर्षीच्या संमेलनाची संकल्पना होती. या संकल्पनेवर विद्यार्थ्यांनी नृत्य, गायनासह इतर कलांच्या साहाय्याने आपल्यातील कलागुणांचे दर्शन घडविले. सिंधी शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून कलाविष्काराने संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमाची रंगत वाढली. यावेळी संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तयार केलेल्या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार व विजेत्यांना पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या उत्सवातून संस्थेचा अभिमानास्पद वारसा आणि कलागुणांचे पोषण, सांस्कृतिक मूल्यांना चालना देण्याची संस्थेची बांधिलकी दिसून आली. पालकांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे आणि शाळेच्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. याप्रसंगी नाशिक सिंधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनेश बदलानी, उपाध्यक्ष कन्हय्यालाल कलानी, सचिव वासुदेव बत्रा, सहसचिव डी. जे. हंसवानी, खजिनदार दीपक आहुजा, तसेच कार्यकारिणी सदस्य अॅड. अनिल आहुजा, हेमंत हिराणी, मुख्याध्यापिका सिमरन मखिजानी, अधीक्षिका रेणू गरचा, नाशिक सिंधी पंचायतचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आहुजा यांच्यासह सिंधी समाजातील मान्यवर व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यकारिणी सदस्य कमलकुमार रिझवानी, मोहन कारिया, किशन अडवाणी, नानकराम दंडवानी, क्रिपालदास करमचंदानी, लीलाराम गुरनानी, दीपक धिरवानी, अनिल उत्तमचंदानी यांनी परिश्रम घेतले.