क्राईम ताज्या बातम्या

प्रवाशांच्या बॅग मधील दागिने व रोख रक्कम चोरी करणाऱ्या परप्रांतीय तोलीस अटक…..गुन्हे शाखा युनिट 1 ची कामगिरी

प्रवाशांच्या बॅग मधील दागिने व रोख रक्कम चोरी करणाऱ्या परप्रांतीय तोलीस अटक…..गुन्हे शाखा युनिट 1 ची कामगिरी…..

गुन्हे शाखा युनिट 1 ने रिक्षामध्ये बसलेल्या प्रवाशांच्या बॅग मधील दागिने व रोख रक्कम चोरी करणारे परप्रांतीय टोळीस अटक करून 03 गुन्हे उघडकीस आणले आहे. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात कलम 379 गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गुन्हे शाखा युनिट एक यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे साजिद पिता वाजिद अली व 39 वर्षे रा.गावअब्दुल्लापूर कुरेशी, मुस्तकीन पिता बुंदू, सोनू उर्फ मोहम्मद आबिद पिता मोहम्मद हुसेन शेख यांना ताब्यात घेतले. संशयितांना ताब्यात
घेऊन चौकशी दरम्यान गुन्हा मधील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गुन्हे शाखा युनिट 1 ने विविध पोलिस ठाण्यात दाखल एकूण 03 गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून सोन्याचा मुद्देमाल व,रोख रक्कम असा एकूण 3,41,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *