प्रभाग 20 मध्ये रविवारी काळजाला भिडणारे व्याख्यान….. नागरिकांनी उपस्थित रहावे नितीन चिडे यांचे आवाहन…..
आपल्या आयुष्यातील प्रत्येक नातं आईचं ममत्व, वडिलांचं त्यागमय प्रेम, आणि मुलांच्या भावना यांचं मोल शब्दात मांडता येत नाही. पण कधी कधी हे नातं समजून घेणं, जगणं आणि जपणं हेच आपल्या जीवनाचं खरं सौंदर्य ठरतं. याच नात्यांच्या गूढ भावविश्वाला स्पर्श करणारे, आपल्या हृदयाला भिडणारे विचार मांडण्यासाठी प्रसिद्ध लेखक, युवा व्याख्याते, समाज परिवर्तनकार, राष्ट्रभूषण व भारतीय नवदालन पुरस्कार विजेते छत्रपती पुरस्कार प्राप्त वसंत हंकारे सर यांचे प्रेरणादायी आणि अंतर्मनाला स्पर्श करणारे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

आई-वडील, मुले, मुली आणि त्यांच्या नात्यातील स्नेह, प्रेम आणि समज यावरील प्रभावी संवाद रविवार १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:०० वाजता अंतरंग अपार्टमेंट शेजारी, के. जे. मेहता कॉलेज जवळ, नाशिक रोड, नाशिक याठिकाणी होणार असून आपल्या उपस्थितीने या भावविश्वाला नक्कीच अधिक उब मिळेल. या स्फूर्तिदायी संध्याकाळी आपण सर्व कुटुंबासह नक्की उपस्थित रहावे असे नम्र आवाहन सौ. दुर्गा नितीन चिडे, मा. विधानसभा प्रमुख, शिवसेना नाशिक पूर्व, समन्वयक : शिवजन्मोत्सव सोहळा समिती, नाशिकरोड-जेलरोड, शिवसेना. नासिक पूर्व माजी विधानसभा प्रमुख, नितीन साहेबराव चिडे यांनी केले आहे.

आपल्या सर्व सुजाण नागरिकांची उपस्थितीनेच या कार्यक्रमाचे सौंदर्य पूर्ण होईल. आपण याल, हीच अपेक्षा व विनंती नितीन चिडे यांनी व्यक्त केली.

