सुभाष रोडला किरकोळ भांडणावरून डोक्यात वीट मारून केले जखमी…..
शहरात कोयता सक्रिय झाली असून विवध ठिकाणी कोयता गँग ने हल्ला करून जखमी केले आहे. नुकतेच वडापाव विक्रेता आणि एका वेगळ्या प्रकरणात समिर नावाच्या युवकावर टोळक्याने हल्ला केला होता. खुलेआम मारहाण तसेच कोयत्याने हल्ला करणे रोजचेच झाले आहे. नासिक रोड सुभाष येथे किरकोळ भांडणाच्या कारणावरून तीन जणांनी एकाच्या डोक्यात वीट मारून जखमी केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी फिर्यादी चेतन सुनील रिपोटे राहणार राजवाडा देवळाली गाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात तीन जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालधक्का रोडवर चेतन हा उभा असताना अचानकपणे निखील भालेराव, प्रकाश शामराव भालेराव व समीर शेख हे तिघे आले व त्यांनी किरकोळ भांडणाचा कारणावरून चेतन याला डोक्यात वीट मारून जखमी केले. वीट मारून तिघेही पळून गेले. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ढगे हे करत आहे.