दारणा नदीवरील पुलाची देखरेख करण्याची गरज…. गावकऱ्यांची मागणी…..
नाशिक पुणे महामार्गावर पळसे गावात इंग्रजांच्या काळामध्ये उभारलेल्या नदीवरील दारणा पूलाने शंभरी पार केली आहे. शंभरी पार करून आजही सदर पूल “अभी तो मै जवान हून” अशा थाटात जुन्या आठवणीच्या खुणा नागरिकांना देत आहे. तीन पिढ्यांची साक्ष असलेला व वाहनधारकांना शंभर वर्षे सेवा देऊन न थकलेल्या पुलाला पर्याय पूल झाल्याने या जुन्या सोन्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे.
सदर पुलाला छोट्या मोठ्या झाडांनी वेढले असून पूलाच्या दोन्ही बाजूंनी कठड्याला लागून प्रचंड प्रमाणामध्ये पिंपळाचे व इतर असंख्य छोटे मोठे वृक्ष वाढत असून त्यांच्या वाढीमुळे या फुलाला मोठा धोक्याची शक्यता आहे. सध्या फुल सुस्थितीत असून या वृक्षांची वाढ होणार नाही आणि भविष्यात सदर वृक्ष त्रासदायक ठरणार नाही याची दक्षता सार्वजनिक बांधकाम विभागाने घेऊन ही वास्तू कायम स्मरणात राहील याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे. नव्या पुलावर काही अडचण आल्यास हा पूल पर्यायी म्हणून निश्चितपणे अजूनही वापरात येऊ शकतो म्हणूनच पुलाची पडझड डागडूजी तसेच स्वच्छता याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने लक्ष घालावे अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील गायधनी, पळसे सोसायटीचे माजी चेअरमन संजय गायधनी, पळसे गावचे पोलीस पाटील सुनील गायधनी, अजित गायधनी, बाळासाहेब गायधनी, अनिल ढेरिंगे, दिलीप गायधनी, नवनाथ गायधनी, भाऊसाहेब गायधनी, जगन राव आगळे, विष्णुपंत गायके, तानाजीराव गायधनी, राजाराम गायधनी, अशोक गायधनी आदींनी केली आहे