दहावीचा निकाल…… अँग्लो उर्दू हाई स्कूल विद्यार्थ्यांचे यश……
विद्यार्थ्यांची वाट पाहत असलेला दहावीचा निकाल अखेर जाहीर झाला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल सोमवारी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात आला. राज्याच्या दहावीचा एकूण निकाल ९५.८१ टक्के लागला असून यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.
मुलींचा निकाल मुलांच्या निकालांपेक्षा २.५६ टक्के अधिक आहे. या परीक्षेत ९७.२१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. तर ९४.५६ टक्के मुले उत्तीर्ण झाली. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दहावीच्या निकालाची घोषणा केली. दहावीच्या निकालात अँग्लो उर्दू हाई स्कूल नाशिकरोड ९१.३०%, देवळाली कॅम्प ९२.८५%, इगतपुरी १००%, निकाल लागला आहे. यामध्ये शेख मुस्क अहमद ८१.१७%, शेख आदिल हर्षद ८०.५०%, मिर्जा अलिषा अझाज बेग ७४%, सय्यद अफिया शाहिद ८०%, शेख अल्विरा खलिल ७६%, शेख ईकरा रहीम ७५%, आलीय शमसोद्दीन शेख ७८.२०%, आलीय शफी सय्यद ७२.८%, फैजान हबीब सिद्दीकी ७०.२०% गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. अँग्लो उर्दू हाई स्कूल व्यवस्थापकाने सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.