नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का
ठाकरे गटातील जवळपास १२ माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश.
नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. गुरुवारी रात्री शिवसेनेचे ठाकरे गटातील १२ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. विशेष म्हणजे शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाशिक सोडताच हे नगरसेवक मुंबईच्या दिशेने काल रवाना झाले होते.
यात माजी नगरसेवक अजय बोरस्ते, सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, डी. जी. सुर्यवंशी, सुदाम ढेमसे, श्यामकुमार साबळे, चंद्रकांत खाडे, सुवर्णा मटाले, पुनम मोगरे, जयश्री खर्जुल, ज्योती खोले यांची नावे समोर आली आहे. तसेच भाजप नगरसेविका कोमल मेहरोलिया यांचे वडील प्रताप मेहरोलिया यांचा देखील प्रवेश झाला आहे या प्रवेश सोहळयात पालकमंत्री दादा भुसे, खा. हेमंत गोडसे यांच्यासह शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थितीत होते.