क्राईम ताज्या बातम्या

एकलहरे रोड चेतन ठमके खुन प्रकरणातील आरोपी जेरबंद……गुन्हेशाखा युनिट क. १ ची कामगिरी

एकलहरे रोड चेतन ठमके खुन प्रकरणातील आरोपी जेरबंद……गुन्हेशाखा युनिट क. १ ची कामगिरी…..

नाशिकरोड पोलीस ठाण्यात एकलाहरे चेतन ठमके खून प्रकरणातील आरोपी गुहणे शाखा युनिट १ ने जेरबंद केले आहे.नाशिक रोड पोलिस ठाण्यात भादवि कलम ३०२ प्रमाणे १८ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयातील इतर पाहिजे आरोपीतांचा त्याअनुषंगाने शोध घेत असताना गुन्हेशाखा युनिट १ चे विशाल काठे यांना गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी प्रफुल्ल पाटील हा दारणा सांगवी ता. निफाड जि. नाशिक येथे फिरत आहे. सदरची माहिती च्या आधारे युनिट १ च्या पथकाने मिळालेल्या बातमीवरून प्रफुल्ल उर्फ सोनु विजय पाटील वय २१ वर्ष, रा. रूम नं. १९, अश्विनी कॉलनी, सामनगाव रोड, नाशिक यास सापळा लावुन दारणा सांगवी ता. निफाड, जि.नाशिक येथे पकडुन ताब्यात घेतले. चौकशीत गुन्हयाची कबुली दिली असून संशयितास पुढील कारवाई साठी नाशिकरोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगीरी पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त प्रशांत बच्छाव,  सहा. पोलीस आयुक्त सिताराम कोल्हे, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलिस निरीक्षक विजय पगारे, सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलिस उप निरीक्षक चेतन श्रीवंत, पोलिस उप निरीक्षक विष्णु उगले, सपोनि रविंद्र बागुल, प्रविण वाघमारे, संदिप भांड, विशाल काठे, नाझीम पठाण, धनंजय शिंदे, विशाल देवरे, प्रशांत मरकड, समाधान पवार, विलास चारोस्कर, अमोल कोष्टी, नितीन जगताप, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, मुक्तार शेख, अनुजा येलवे अशांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *