ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन ही युवा पिढीला काळाची गरज…
लेखक श्रीराम कुंटे यांचे प्रतिपादन. जगातील सर्वच राष्ट्र विविधतेने नटलेले असून माझ्या ( भिंती पलीकडील चीन) या पुस्तकाच्या माध्यमातून मी महासत्ता म्हणून जगविख्यात झालेल्या चीन राष्ट्राचे वर्णन या पुस्तकात केल्याने पुस्तकाचा वाचक वर्ग वाढून चीन विषयी संपूर्ण देशात माहिती उपलब्ध करून देण्याचा एक प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन श्री कुंटे यांनी केले विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत उपलब्ध असलेल्या ग्रंथालयाचा किमान वर्षभरात जास्तीत जास्त पुस्तकांचे वाचन करून आपल्या बौद्धिक ज्ञानात भर पाडावी यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी व शिक्षक वृंदांनी जातीने लक्ष घालून वाचनाची सवय विद्यार्थ्यांना अंगी निर्माण करावी भविष्यात ज्ञान हे फार काळाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले पळसे येथे वाचनालयात आयोजित या विद्यार्थी संवाद मेळाव्यात लेखक श्री श्रीराम कुंटे यांच्याशी थेट प्रश्नावलीच्या माध्यमातून चीन विषयावर उपस्थित विद्यार्थी संचालक मंडळ व काही ग्रामस्थ यांनी प्रश्न उपस्थित केले या सर्व प्रश्नाचा लेखक कुंटे यांनी सविस्तर माहिती देत आनंद घेतला कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष विष्णुपंत गायखे होते.

प्रारंभी प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय बोरसे यांनी केले याप्रसंगी प्रमुख पाहुणे लेखक श्री श्रीराम कुंटे यांचा शाळेतर्फे अध्यक्ष गायके यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी चीन संदर्भात मनात असलेल्या प्रश्नांद्वारे श्रीकुंटे यांच्याकडून माहिती घेतली उपस्थित संचालक मंडळातील काही संचालक श्री अनिल ढेरिंगे. चंद्रभान आगळे. श्रीमती देवराळे मॅडम. ज्येष्ठ पत्रकार नंदू नरवाडे. शिक्षक समाधान गायखें माजी सरपंच सुनील गायधनी आदि उपस्थित मान्यवरांनी चीन संदर्भातील महत्त्वाच्या प्रश्नांना हात घालत लेखक कुंटे यांच्याकडून चीनची माहिती घेतली चीनची भौगोलिक परिस्थिती बघता चीनचाही बहुतांश भाग ओसाड व डोंगराळ जंगलमय आहे चीनमध्ये वृद्धत्व ही एक मोठी समस्या आहे लोकसंख्या जगात आज त्यांनी दुसऱ्या क्रमांकावर आनली असून लोकसंख्येच्या बाबतीत चिन्हही सावध रीतीने मार्गक्रमण करत असल्याने तसेच चीनचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणामकारक नियोजन असते राजकीय बाबतीत चीनमध्ये भारत देशा सारखा विषय नाही शेतीला पूरक जोडधंदेही चीनमध्ये आहेत चीनची कृषी भौगोलिक राजकीय सामाजिक सर्वच माहिती यावेळी लेखक कुंटे यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तर देताना डोळ्यासमोरच
उभी केली या कार्यक्रमास मोठ्या संख्येने मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धोंगडे मॅडम यांनी केले तर आभार आशीर्वाद गायखें यांनी मांडले याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संधान सर. ज्येष्ठ पत्रकार सुनील पवार नंदू चव्हाण संस्थेचे संचालक रमेशचंद्र मोरे. रुंजा गायधनी चंद्रभान आगळे शिवाजी गायखें विनोद डेरिंगे. अनिल ढेरिंगे शाळेचे शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते


