महाराष्ट्राची अभिमानास्पद ऐतिहासिक कामगिरी……अस्मिता महिला सायकलिंग लीग…… रुद्रपूर उत्तराखंड येथे २ ते ३ मे २०२६ दरम्यान आयोजित अस्मिता महिला सायकलिंग लीग स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला सायकलपटूंनी दमदार कामगिरी करत सब कनिष्ठ श्रेणीत एकूण गुणांच्या आधारे चॅम्पियनशिप जिंकत ऐतिहासिक यश संपादन केले. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करत राज्याचा गौरव वाढवला. नाशिकच्या शिया […]
Month: May 2026
सातपूर बॅटरी चोरीचे गूढ उकलले; गुन्हे शाखा युनिट-२ कडून सराईत गुन्हेगार जेरबंद….
सातपूर बॅटरी चोरीचे गूढ उकलले; गुन्हे शाखा युनिट-२ कडून सराईत गुन्हेगार जेरबंद…. नाशिक : सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आयशर गाड्यांच्या बॅटरी चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला नाशिक गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी या कारवाईत १ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या […]
सुरगाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या…. बुबळी तलावातील गाळ काढण्यास सुरूवात…
सुरगाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या….बुबळी तलावातील गाळ काढण्यास सुरूवात… नाशिक, सुरगाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बुबळी तलावातील गाळ काढण्याच्या कामाला नगरपंचायतीच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे. यामुळे सुरगाणा शहरासह परिसरातील १२ खेडी व पाड्यांच्या पाणीटंचाईच्या समस्येवर दिलासा मिळणार आहे. सुरगाणा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुभाष जानोरे, माजी नगराध्यक्ष तसेच संबंधित विभागीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत बुबळी तलावातील गाळ काढण्याबाबत चर्चा झाली. तलावाची […]
नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई: देवळाणे येथील शेतकरी दाम्पत्यावर ॲसिड हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना अटक…
नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई: देवळाणे येथील शेतकरी दाम्पत्यावर ॲसिड हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना अटक… नाशिक येवला तालुक्यातील देवळाणे येथे एका शेतकरी दाम्पत्यावर झालेल्या भीषण ॲसिड हल्ल्याप्रकरणी येवला तालुका पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली आहे. ही घटना ८ मे २०२६ च्या रात्री घडली. देवळाणे येथील शेतकरी भाऊसाहेब बोर्डे आणि त्यांची पत्नी त्यांच्या […]
टीसीएस लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित निदा खान अखेर मध्यवर्ती कारागृहात….
टीसीएस लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित निदा खान अखेर मध्यवर्ती कारागृहात…. टीसीएस मधील बहुचर्चित लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिचा पोलीस कोठडीतील मुक्काम संपला आहे. तब्बल दोन महिना पोलिसांना गुंगारा देणाऱ्या गर्भवती निदा खानला नाशिकरोड न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, तिची रवानगी आता नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. […]
नाशिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; वर्षभरापासून फरार असलेला सराईत चोरटा जेरबंद…..
नाशिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; वर्षभरापासून फरार असलेला सराईत चोरटा जेरबंद….. नाशिक | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील गेल्या वर्षभरापासून फरार असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला नाशिक गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. सौरभ अर्जुन पवार (वय २१, रा. सिडको) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. अशी […]
प्रा. नरेश पाटील यांना पीएच.डी प्राप्त….
प्रा. नरेश पाटील यांना पीएच.डी प्राप्त…. नाशिकरोड :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील भूगोल विभागातील सहा. प्रा. नरेश पाटील यांना जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ वतीने नुकतीच पीएचडी प्राप्त झाली. त्यांना धुळे नगाव येथील महाविद्यालयातील विभाग प्रमुख प्रा.डॉ. सुरेश शेलार यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचा विषय ” एप्लीकेशन ऑफ रिमोट सेन्सिंग […]
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या……पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा…..
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या……पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा….. नाशिकरोड जेलरोड परिसरातील दसक गाव येथे सासरच्या सातत्याने होत असलेल्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून एका ४० वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आशा प्रवीण घोटेकर असे मृत विवाहितेचे नाव आहे. संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला येथील गणेश गोपाळराव वाळके यांची […]
अंबड पोलिसांची धडाकेबाज कारवाई: चेन स्नॅचिंगचे दोन गुन्हे उघड, २ लाखांचा मुद्देमाल जप्त…
अंबड पोलिसांची धडाकेबाज कारवाई: चेन स्नॅचिंगचे दोन गुन्हे उघड, २ लाखांचा मुद्देमाल जप्त… नाशिक (प्रतिनिधी) – अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत चेन स्नॅचिंगच्या दोन गुन्ह्यांचा उलगडा केला असून, आरोपींकडून सुमारे २,००,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, पोलीस उपआयुक्त किशोर काळे तसेच सहाय्यक […]









