क्राईम ताज्या बातम्या

नाशिकमध्ये घरफोडी प्रकरण उघड; २ आरोपी मुद्देमालासह अटकेत…

नाशिकमध्ये घरफोडी प्रकरण उघड; २ आरोपी मुद्देमालासह अटकेत… नाशिक : अंबड परिसरात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत अंबड पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त कार्यालय, नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, घरफोडीच्या घटनेनंतर गुन्हे […]

क्राईम ताज्या बातम्या

पेट्रोल पंप शुल्क भरण्यासाठी लाचेची मागणी…..लाचखोर आरोपी ताब्यात….लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई…..

‎ पेट्रोल पंप शुल्क भरण्यासाठी लाचेची मागणी…..लाचखोर आरोपी ताब्यात….लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई….. ‎ ‎ ‎नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी पोलीस ठाणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई करीत ​२८ एप्रिल रोजी ‎वणी विभागातील वैध मापनशास्त्र निरीक्षक भगवान प्रल्हाद डोल्हारे यांना ताब्यात घेतले. ‎वणी विभाग, दिंडोरी, नाशिक येथील ​तक्रारदार यांनी त्यांच्या पेट्रोल पंपाच्या पडताळणीसाठी शासकीय शुल्काचा भरणा करून […]

क्राईम ताज्या बातम्या

बिटको रुग्णालयात कोयत्याने वार करणारा सनी चटोले ताब्यात…. गुंडा विरोधी पथकाची कामगिरी…..

‎ बिटको रुग्णालयात कोयत्याने वार करणारा सनी चटोले ताब्यात…. गुंडा विरोधी पथकाची कामगिरी….. ‎ ‎ ‎हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात आपतकालीन विभागात कोयत्याने वार करून, धुडगूस घालुन, शासकिय कामात अडथळा आणणारा व दोन गुन्हयामध्ये फरार आरोपी सनी चटोले याला गुंडा विरोधी पथक, गुन्हे शाखा, नाशिक यांनी नाशिकरोड येथुन घेतले ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखा अंतर्गत पोलीस […]

आरोग्य विशेष

कमी वयात मुलींना पाळी येऊ नये म्हणून ५ व्यायाम

काही वर्षांपुर्वीचा काळ असा होता की मुलींना साधारण त्या आठवी, नववी, दहावी या इयत्तांमध्ये गेल्यावर पाळी यायची. पण आता मात्र पाळी येण्याचं वय खूप अलिकडे आलं आहे. अगदी तिसरी, चौथीमध्ये शिकणाऱ्या मुलींना पाळी आल्याच्या कित्येक घटना कानावर येत आहेत. हे असं सगळं आजुबाजुला घडत असताना आपल्या लेकीच्या बाबतीत असं काही होऊ नये म्हणून कित्येक पालक […]

आरोग्य विशेष

गर्भनिरोधक इंजेक्शनमुळे महिलेने गमावली दृष्टी?

अवेळी गर्भधारणा टाळायची असेल तर जास्तीत जास्त महिला गर्भनिरोधकांचा वापर करतात. काही महिला यासाठी गोळ्या खातात तर काही महिला इंजेक्शन घेतात. गर्भधारणा रोखण्यासाठी इतरही काही उपाय आहेत. पण कधी कधी हे उपाय खूप घातक ठरतात. ब्रिटनमधील एका महिलेसोबत असंच काहीसं झालं. एका छोट्याशा मेडिकल प्रक्रियेने तिला मोठं अडचणीत आणलंय. द मिररच्या एका रिपोर्टनुसार, या महिलेने […]

विज्ञान-तंत्रज्ञान

Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक

जर तुम्ही रोजच्या वापरासाठी गुगल क्रोम ब्राउझर वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारताची सायबर सुरक्षा संस्था CERT-In ने क्रोममधील गंभीर बगबाबत इशारा दिला आहे. या त्रुटीचा फायदा घेत हॅकर्स तुमच्या संगणकावर दूरून नियंत्रण मिळवू शकतात. CERT-Inच्या अहवालानुसार, क्रोमच्या काही जुन्या व्हर्जनमध्ये गंभीर सुरक्षा त्रुटी आढळल्या आहेत. या बग्समुळे हॅकर्स तुमच्या सिस्टममध्ये […]

विज्ञान-तंत्रज्ञान

एअरटेल ग्राहकांना महागाईचा शॉक! ८४ दिवसांचा प्लॅन महागला

देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या किमतीत गुपचूप वाढ केली आहे. कंपनीने आपल्या सर्वात लोकप्रिय अशा ८४ दिवसांच्या प्लॅनची किंमत वाढवली असून, काही स्वस्त प्लॅन्स बंद करून ग्राहकांसमोर महागड्या रिचार्जचाच पर्याय ठेवला आहे. यामुळे सर्वसामान्य मोबाईल युजर्सचे बजेट कोलमडणार आहे. एअरटेलचा जो प्लॅन आधी ८५९ रुपयांना मिळत होता, त्यासाठी आता ग्राहकांना ८९९ […]

गुन्हेगारी

हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं…

अमेरिकेतील लुइझियाना राज्यातील श्रेव्हपोर्ट येथे एक दुःखद घटना घडली. एका व्यक्तीने एक ते १४ वर्षे वयोगटातील आठ मुलांना गोळ्या घालून ठार केले. मिळालेल्या माहितीनुसार, या मुलांपैकी सात मुले त्याची स्वतःची होती आणि तो आठव्या मुलाचा काका होता. ही घटना अलिकडच्या वर्षांतील सर्वात गंभीर आणि धोकादायक गोळीबार घटनांपैकी एक मानली जात आहे. आठ मुलांपैकी पाच मुली […]

गुन्हेगारी

पुण्यात व्यावसायिकाची निवृत्त एसीपीकडून तब्बल अडीच कोटींची फसवणूक; धमकी दिल्याचाही आरोप

जमीन खरेदीत मोठा फायदा करून देण्याच्या बहाण्याने एका निवृत्त सहायक पोलिस आयुक्ताने व्यावसायिकाची तब्बल २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच, एका व्यक्तीच्या नावाने खोटे बँक खाते उघडून आणि बनावट कंपनीच्या नावाने व्यवहार करून रक्कम उकळल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी त्याची पत्नी, मुलासह पाच जणांविरोधात चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल […]

Uncategorized

लाखोंच्या हुंड्याची मागणी; सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी छळ, वाघोलीत २ विवाहितांनी उचलले टोकाचे पाऊल

वाघोली परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये विवाहित महिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दोन्ही प्रकरणांत पैशांसाठी सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक छळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाघोली पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. पहिल्या घटनेत रचियता अभिषेक गुप्ता (वय ३७) असे मृत महिलेचे नाव आहे. पीडितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पती अभिषेक […]