ताज्या बातम्या नाशिक

ऋतुरंग भवन मध्ये २१ जुन रोजी ‘ मेहेकी यादे – बारिश गीतोके साथ ‘ बहारदार पाऊस गीतांचा कार्यक्रम….

ऋतुरंग भवन मध्ये २१ जुन रोजी ‘ मेहेकी यादे – बारिश गीतोके साथ ‘ बहारदार पाऊस गीतांचा कार्यक्रम….


नाशिकरोड : एस व्ही कराओके सिंगिंग क्लब, नाशिकरोड आयोजित संजय परमसागर व विनोद बर्वे प्रस्तुत ‘ मेहेकी यादे – बारिश गीतों के साथ ‘ या बहारदार संगीत मैफिलीचे ( पुष्प ४ थे ) रविवार दि. २१ जुन रोजी सायंकाळी ५. ४५ वाजता ऋतुरंग भवन, नाशिकरोड येथे आयोजित करण्यात आला आहे. या मैफिलीत एकूण २२ गायक आपले गायन कौशल्य सादर करणार असून विविध आवडत्या हिंदी व मराठी पाऊस गाण्यांचा सुरेल संगम रसिकांना अनुभवता येणार आहे . या सांगितिक मैफिलीत गायक संजय परमसागर यासह विनोद बर्वे, गॉडविन लुईस, स्वप्ना गोखले, वनिता आहेर, प्रितम आमेसर, दत्तात्रय पाटील, जितेंद्र दिवे, गौतम भदाणे, वैशाली राजपूत, अनिल पांचाळ, अनिल गुरव, प्रकाश महाले, डॉ. सुनयना भुजबळ, शैलजाताई सुरेंद्रनाथ सोनार , अस्मिता कुलकर्णी, रोहीत कुलकर्णी तसेच अतिथी गायक मोहनभाऊ पवार आपल्या सुरेल आवाजात हिंदी व मराठी पाऊस गाणी सादर करणार आहेत. ध्वनी व्यवस्था सुरेश काफरे आणि सूत्रसंचालन नीता देशमुख करणार आहेत . कार्यक्रम वेळेवर सुरू होईल. उपस्थित ५ भाग्यवंतांना आकर्षक भेटवस्तु दिली जाईल. कार्यक्रमास प्रवेश मोफत असून जास्तीत जास्त श्रोत्यांनी उपस्थित रहावे व कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे संयोजकांनी कळवले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *