टीसीएस लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित निदा खान अखेर मध्यवर्ती कारागृहात….
Oplus_131072
टीसीएस मधील बहुचर्चित लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिचा पोलीस कोठडीतील मुक्काम संपला आहे. तब्बल दोन महिना पोलिसांना गुंगारा देणाऱ्या गर्भवती निदा खानला नाशिकरोड न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, तिची रवानगी आता नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
चार दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर निदा खानला आज सोमवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश केदार जोशी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. निदा खान हिच्यावर असलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर सरकारी पक्ष आणि बचाव पक्षात जोरदार युक्तीवाद झाला होता. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सरकारची बाजू मांडली. पोलीस कोठडी दरम्यान निदा आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांची समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली होती. या तपासात काही महत्त्वाचे दुवे हाती लागल्याचे समजते. निदा खानच्या वतीने अॅड. राहुल कासलीवाल यांनी काम पाहिले.
जेलरोड भागात घरांवर दगडफेक……टवाळखोरांचा बंदोबस्त करा….. त्रस्त रहिवाशांची पोलिसांकडे मागणी.,… नाशिकरोड जेलरोड परिसरातील कॅनल रोडवरील राजीव गांधी नगर आणि इंगळे नगर भागात गेल्या महिनाभरापासून अज्ञात समाजकंटकांकडून घरांवर दगडफेक करण्याचे प्रकार सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दगडफेकीमुळे महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून, संबंधित टोळक्याचा तातडीने शोध घेऊन […]
नाशिकरोडच्या सहायक पोलीस आयुक्त (ACP) कार्यालयाचे पुन्हा जुन्या ठिकाणी स्थलांतर करण्याची मागणी…… नाशिकरोड येथील सहायक पोलीस आयुक्त, विभाग-४ यांचे कार्यालय काही दिवसांपूर्वी नवीन उपनगर पोलीस ठाणे येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे नागरिक, पक्षकार, वकील तसेच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याने हे कार्यालय पुन्हा पूर्वीच्या मध्यवर्ती ठिकाणी हलविण्याची मागणी […]
स्व. अजितदादा पवार संस्था अध्यक्षपदी नंदू नरवाडे….. सरचिटणीसपदी गायधनी…. पळसे येथील स्व. अजितदादा पवार सामाजिक संस्थेच्या अध्यक्षपदी नंदू नरवडे, तर सरचिटणीसपदी बाळासाहेब गायधनी यांची निवड करण्यात आली. संस्थेचे मार्गदर्शक श्रीधर गायधनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गावाला स्वच्छ व सुंदर करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. संस्थेची ध्येयधोरणे, आणि समस्यांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. […]