क्राईम ताज्या बातम्या

नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई: देवळाणे येथील शेतकरी दाम्पत्यावर ॲसिड हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना अटक…

नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई: देवळाणे येथील शेतकरी दाम्पत्यावर ॲसिड हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना अटक…

नाशिक येवला तालुक्यातील देवळाणे येथे एका शेतकरी दाम्पत्यावर झालेल्या भीषण ॲसिड हल्ल्याप्रकरणी येवला तालुका पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली आहे.

ही घटना ८ मे २०२६ च्या रात्री घडली. देवळाणे येथील शेतकरी भाऊसाहेब बोर्डे आणि त्यांची पत्नी त्यांच्या शेतातील घराच्या गच्चीवर झोपलेले असताना, अज्ञात आरोपींनी त्यांच्या डोळ्यावर आणि शरीरावर ॲसिडसारखा घातक पदार्थ फेकला होता. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

१) चांगदेव देवराम मोरे (वय ४० वर्षे, रा. देवळाणे, ता. येवला)
२) सचिन जालिंदर कोटमे(वय २० वर्षे, रा. देवळाणे, ता. येवला)

पोलीस तपासात असे निष्पन्न झाले आहे की, जखमी भाऊसाहेब बोर्डे आणि मुख्य आरोपी चांगदेव मोरे यांच्यात शेतीच्या बांधावरून जुना वाद होता. तसेच, भाऊसाहेब यांचे यावर्षी कांद्याचे उत्पादन चांगले झाले होते आणि ते आरोपीबद्दल लोकांसमोर वाईट बोलत असल्याचा राग चांगदेवच्या मनात होता. याच रागातून, शेतातील तण आणि काटेरी झुडपे जाळण्यासाठी आणलेले ॲसिड एका बाटलीत भरून आरोपींनी रात्रीच्या वेळी हा हल्ला केला.

पोलीस अधीक्षक (नाशिक ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली, येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिकआणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक पुराव्यांच्या आधारे या आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *