स्व. अजितदादा पवार संस्था अध्यक्षपदी नंदू नरवाडे….. सरचिटणीसपदी गायधनी….
पळसे येथील स्व. अजितदादा पवार सामाजिक संस्थेच्या अध्यक्षपदी नंदू नरवडे, तर सरचिटणीसपदी बाळासाहेब गायधनी यांची निवड करण्यात आली. संस्थेचे मार्गदर्शक श्रीधर गायधनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गावाला स्वच्छ व सुंदर करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. संस्थेची ध्येयधोरणे, आणि समस्यांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.

संस्थेच्या नव्या सचिवपदी बाळासाहेब गायधनी, कार्याध्यक्षपदी हिरामण गायधनी, उपाध्यक्षपदी गणेश गायधनी, प्रदीप बाळासाहेब गायधनी तर सहसचिवपदी सूरज गायधनी, सल्लागारपदी रवींद्र गायधनी, राम गायधनी यांची निवड करण्यात आली. संस्थेने दिलेल्या जबाबदारीनुसार गावासह परिसराच्या विकासाला चालना देऊ. सर्वांना सोबत घेऊन समाजातील आदर्शवत कामे करणारं असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष नंदू नरवाडे यांनी बोलतांना सांगितले.





