गोवंशाची अवैध वाहतूक व कत्तल रोखण्यासाठी नाशिकमध्ये ‘ॲक्शन प्लॅन’…. पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत आंतरविभागीय बैठक संपन्न…. नाशिक शहरासह परिसरात गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक आणि बेकायदेशीर कत्तलखान्यांवर पूर्णपणे लगाम घालण्यासाठी नाशिक पोलीस प्रशासन कमालीचे ॲक्शन मोडमध्ये आले आहे. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आणि कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी आज पोलीस आयुक्त कार्यालयात एका महत्त्वाच्या आंतरविभागीय समन्वय […]
Day: May 25, 2026
खाकीचा दणका: नाशिकरोड आणि वाकडमधील घरफोड्यांचा पर्दाफाश, ३५ लाखांच्या मुद्देमालासह सराईत चोरटा जेरबंद…. गुन्ह्यांचा अंधार कितीही गडद असला, तरी कायद्याचा सूर्य उगवतोच, हात फिरेल पोलिसांचा पाठीवर, तर गुन्हेगारांचे धाबे दणाणतातच…! नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने अत्यंत धडाकेबाज कामगिरी करत नाशिकरोड आणि पिंपरी-चिंचवडमधील वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एका सराईत आरोपीला बेड्या ठोकल्या असून, त्याच्याकडून तब्बल ३५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सराफ बाजारात रचला सापळा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार नाशिकरोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक सराफ बाजार व संवेदनशील भागात गस्त घालत होते. याच दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी व त्यांच्या पथकातील अंमलदारांना गोपनीय माहिती मिळाली की, सराफ बाजारातील देवी चौक परिसरात एक संशयित इसम चोरीचे सोने विकण्यासाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वेळेचा अपव्यय न करता देवी चौक परिसरात अत्यंत शिताफीने सापळा रचला आणि संशयिताला ताब्यात घेतले. ३५ लाखांचे सोने जप्त पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्याचे नाव सचिन भगवान सहजराव (वय २५, रा. ताथवडे, बदने वस्ती, ता. मुळशी, जि. पुणे) असे असल्याचे समोर आले. त्याची अंगझडती घेतली असता पोलिसांना थक्क करणारा मुद्देमाल मिळाला. त्याच्याकडून २३ तोळे सोन्याचे दागिने १ तोळा सोन्याची लगड एकूण किंमत: ३५,००,०००/- (पस्तीस लाख रुपये) चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुणे-नाशिकमधील गुन्हे उघड तपासादरम्यान समोर आले की, हा मुद्देमाल नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल गु.र.नं. ३१८/२०२६ आणि वाकड पोलीस ठाणे (पिंपरी चिंचवड) येथील गु.र.नं. २४०/२०२६ मधील घरफोडीचा आहे. आरोपीवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवादार सागर आडणे करत आहेत. या पथकाने केली कामगिरी ही धडक कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे, पोलिस निरीक्षक अतुल चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि गुन्हे शोध पथकातील विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, संध्या कांबळे, अरुण गाडेकर, रोहित शिंदे आणि योगेश रानडे यांच्या पथकाने केली. पोलीस आयुक्तांनी या कामगिरीबद्दल पथकाचे कौतुक केले आहे.
खाकीचा दणका: नाशिकरोड आणि वाकडमधील घरफोड्यांचा पर्दाफाश, ३५ लाखांच्या मुद्देमालासह सराईत चोरटा जेरबंद…. गुन्ह्यांचा अंधार कितीही गडद असला, तरी कायद्याचा सूर्य उगवतोच, हात फिरेल पोलिसांचा पाठीवर, तर गुन्हेगारांचे धाबे दणाणतातच…! नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने अत्यंत धडाकेबाज कामगिरी करत नाशिकरोड आणि पिंपरी-चिंचवडमधील वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एका […]


