बिटको जव
ळ अपंग महिलेला लुटणाऱ्या रिक्षा चालकास ठोकल्या बेड्या….. नाशिकरोड गुन्हे शोध पथकाची उत्कृष्ट कामगिरी……
अपंग महीलेला दमबाजी करून तिचे ATM कार्ड जबरी चोरी करून रोख रक्कम चोरी करणा-या रिक्षा चालकास नाशिकरोड पोलीस ठाणे गुन्हेशोध पथकाने बेड्या ठोकल्या. १३ जून रोजी रात्री साडे आठ च्या सुमारास बिटको येथील बँक ऑफ महाराष्ट्र जवळ अनोळखी रिक्षा चालकाने एक अपंग महीला रेहाना फईम शेख राहणार येवला, जुना नगरपालिका रोड, तालुका येवला हिला दमबाजी करून तिच्या हातातील बँक ऑफ महाराष्ट्र चे एटीएम कार्ड हिसकून घेवुन सदर अंपग महीलेला रिक्षातून खाली जोरात ढकलुन रिक्षा घेवुन पळुन गेला होता. तसेच त्याने अंपग महीलेच्या खात्यातून वेळो-वेळी २३,००० रुपये काढुन चोरी केली होती. अपंग महिलेच्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अनोळखी इसमाचा व रिक्षाचा काहीएक ठाव ठिकाणा नसतांना गुन्हे शोध पथकातील योगेश रानडे, रोहीत शिंदे, अरूण गाडेकर यांनी वारंवार घटनास्थळावरील व गुन्हयातील तसेच इतर ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासुन सदर रिक्षा ही जेलरोड पटटयावर चालणारी असल्याबाबत गुप्त माहीती मिळाली. गुन्हे पथकाचे विशाल पाटील, विष्णु गोसावी, महेंद्र जाधव, सागर आडने, आदींनी सापळा रचुन अतिशय शिताफीने कैौशल्यपुर्वक रिक्षा क्र. MH 15 AK 6599 व त्यावरील संशयीत चालक प्रविण आनंद नेटावणे राहणार शांतीपार्क, ईच्छामणी मंदीराचे मागे, उपनगर, नाशिकरोड नाशिक यास ताब्यात घेतले. त्याचे कडुन त्याने जबरी चोरी केलेले महाराष्ट्र बँकेचे एटीएम कार्ड जप्त करण्यात आले तसेच एटीएमचा वापर करून चोरी केलेली २३,०००/-रू रोख रक्कम व गुन्हयात वापरलेली ८०,०००/- रू कि. रिक्षा असा एकुन १,०३,०००/- रू कि. मुददेमाल पोलिसांनी जप्त केला.
सदर उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण सुर्यवंशी, पोलीस उप निरीक्षक संदिप पवार तसेच गुन्हेशोध पथकाचे विशाल पाटील, विष्णु गोसावी, देवरे, महेंद्र जाधव, गाडेकर, सागर आडणे, रोहित शिंदे, संतोष पिंगळ, योगेश रानडे आदींनी केली .