Homeताज्या बातम्याविहिरीवरील मोटारीची चोरी.... चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी....
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

विहिरीवरील मोटारीची चोरी…. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी….

नाशिक तालुक्यातील पळसे गावला पाणीपुरवठा करणाऱ्या पळसे बुर्जा जवळील दारणा नदीकाठी चेहडी बंधाऱ्यालगत असलेल्या पाणीपुरवठा विहिरीवरील मोटरीची केबल दुसऱ्यांदा चोरी जाण्याचा प्रकार झाला. दरणेश्वर महादेव मंदिर पाणीपुरवठा योजनेची केबलही चोरट्याने चोरून नेली. चेहडी बंधारा दारणा काठावरील शेतकऱ्यांच्या मोटरीच्या कॉपर केबल जाण्याचे व मोटर जाण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असून भुरट्या चोरांनी या भागामध्ये धुमाकूळ घातला आहे. धारणा काठावरून सिन्नर एमआयडीसी शिंदे गाव यासाठी ही पाणीपुरवठा योजना कार्यरत असून यांच्याही केबलला सदर भुरट्या चोरांनी दणका दिला आहे.

वारंवार होणाऱ्या केबल चोरी व मोटरीचोरी ने शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. वाढत्या चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हानी होत असून पळसे ग्रामपंचायतिला सुद्धा आर्थिक फटक बसल्याने सदर चोरांचा बंदोबस्त त्वरित करावा अशी मागणी पळसे गावच्या सरपंच सौ ताराबाई गायधनी, विष्णुपंत गायके, अनिल डेरिंगे, समाधान डेरिंगे, सुनील गायधनी, संजय गायधनी, भाऊसाहेब दळवी, नवनाथ गायधनी, भाऊसाहेब गायधनी, दिलीप गायधनी, दिनकर गायधनी, वसंत गायधनी आदींनी केली आहे. सदर चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

घटनास्थळी पळसे गावचे पोलीस पाटील सुनील गायधनी, संजय गांयधनी, श्रीधर गायधनी, वसंत गायधनी, सुनील गायधनी, ग्रामपंचायत कर्मचारी भाऊसाहेब दळवी, शुभम गायधनी, गुड्डू शिंदे आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments