क्राईम ताज्या बातम्या

एकलहरे रोडवर तरुणाचा मृतदेह मिळून आल्याने खळबळ…..

एकलहरे रोडवर तरुणाचा मृतदेह मिळून आल्याने खळबळ…..

येथील एकलहरे रोड वरील किर्लोस्कर कंपनीच्या समोर एका २५ ते ३० वयोगटातील तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे,
पोटावर धारदार हत्याराने हल्ला करून खून करण्यात आलेल्या तरुणाचा मृतदेह रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना दिसून आला.

शहरात खुनाचे सत्र सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोयता हल्ला, गोळीबार आदी घटनांनी शहरात गुंडांचे राज्य आहे का ? हा प्रश्न निर्माण होत आहे. रविवारी १८ फेब्रुवारी रोजी सकाळी तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार झाल्याच्या जखमा आहेत. पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक रामदास शेळके, गुन्हे शोध पथक, पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

खून करण्यात आलेल्या तरुणाची ओळख अजून पटली नसून अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *