टॅक्सी रिक्षा विलंभ दंड रद्द करा…..पीपल्स रिब्लिकन पार्टी तर्फे निवेदन……
केंद्र राज्य सरकारच्या रिक्षा, टॅक्सी पासिंग विलंब पन्नास रुपये दंड मागे घेण्यात यावा यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
केंद्र व राज्य शासनाच्यावतीने रिक्षा, टॅक्सीचे योग्य प्रमाणपत्र, पासिंग या बाबत एक दिवस विलंब झाल्यास प्रतिदिवस रु. ५०/- दंड व जेव्हापासून पासींग नाही तेव्हापासून दंड हा नाशिक आर.टी.ओ. कडून वसुल केला जात असल्याने या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात केंद्र शासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या वतीने जो निर्णय घेण्यात आहे या निर्णयाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालक मालक संघटना या आंदोलन करीत आहेत, त्यामुळे हा जो निर्णय आहे हा तात्काळ आपण मागे घेऊन रिक्षा चालकांवर होणारा जो जाचक कर लादला गेला आहे तो लवकरात लवकर मागे घेण्यात यावा या मागणीसाठी विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले आणि तसे न झाल्यास येणा-या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी पीपल्स रिपब्लीकन पार्टीच्या जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हावने, मुरली घोरपडे, नितीन पगारे, शकील शेख, अमर जाधव, विनोद धोत्रे, रफिक मंसुरी, भारत जाधव, जमीर मणियार, संतोष भालेराव, स्वप्नील दोंदे अमोल ढाकणे, उदय तायडे, हनीफ शेख, वैभव साळवे, अब्दुल सिद्दीकी, गणेश चौधरी, इंद्रजित भालेराव सह रिक्षा चालक मालक सदस्य उपस्थित होते.