Homeताज्या बातम्यासहकार खाते पतसंस्था निवडणूक बिनविरोध..... चेअरमन पदी दत्तात्रय कुंदे तर व्हाइस चेअरमन...

सहकार खाते पतसंस्था निवडणूक बिनविरोध….. चेअरमन पदी दत्तात्रय कुंदे तर व्हाइस चेअरमन म्हणून प्रदिप महाजन यांची बिनविरोध निवड

सहकार खाते पतसंस्था निवडणूक बिनविरोध….. चेअरमन पदी दत्तात्रय कुंदे तर व्हाइस चेअरमन म्हणून प्रदिप महाजन यांची बिनविरोध निवड……

नाशिक जिल्हा सहकार खाते सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक या संस्थेची पदाधिकारी निवड दिनांक १६ फेब्रुवारी रोजी संपन्न झाली. सदर पतसंस्थेचे नाशिक जिल्ह्यातील सहकार विभागतील अधिकारी / कर्मचारी सभासद असून संस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडली.

अविरोध निवडणुकीची परंपरा सदस्यांनी कायम ठेवली.बिनविरोध झालेल्या निवडणुकीत
सर्वसाधारण मतदार संघ, दत्तात्रय कुंदे , एम बी त्रिभुवन, किशोर भालेराव , कैलास आढाव तर इतर मागास प्रवर्गातून , प्रदीप महाजन, विजाभाज सचिन काकड, महिला राखीव गटात सुरेखा पालदे, स्वप्नाली शिंदे, अजा /अज अनिल घरडे हे उमेदवार बिनविरोध निवडून आले.


दत्तात्रय कुंदे यांची चेअरमन पदी तर प्रदीप महाजन यांची व्हाईस चेअरमन पदावर बिनविरोध निवड झाली. नव निर्वाचित चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचे सर्व सभासदांनी अभिनंदन केले आहे तसेच जिल्हा उपनिबंधक नाशिक फयाज मुलाणी यांनी पुष्प गुच्छ देवून सत्कार केला .

Advertisement

Advertisementspot_imgspot_imgspot_imgspot_img
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments