इंडिया सिक्युरिटी प्रेसवर आतंकवादी हल्ल्याचा प्रयत्न…… कमांडो कारवाईत अतिरेकी ठार….. एक जवान जखमी….. ओलीस कर्मचाऱ्याची सुटका……
स्वातंत्र्य दिन जवळ असताना नाशिकरोड येथील इंडिया सेक्युरिटी प्रेसवर सोमवारी अतिरेकी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला पण तैनात जवानांनी तात्काळ कारवाई करीत हल्ला परतवून चार अतिरेक्यांना यमसदनी पाठविले. अतिरेकी हल्ल्याची खबर मिळताच इंडिया सिक्युरिटी प्रेसची सी आय एस एफ, नाशिक रोड पोलिस, बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. हल्ल्याची बातमी पसरताच प्रेस कामगार आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन एकच खळबळ उडाली आणि भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले. इंडिया सिक्युरिटी प्रेस अगदी जवळ महसूल आयुक्त, फॅमिली कोर्ट, वाहतूक शाखेचे कार्यालय आणि इतर महत्वाचे कार्यालय असल्याने नागरिकांची या ठिकाणी वर्दळ असते. प्रेस सुटल्यानंतर कामगारांच्या जाणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन अतिरेकी आत घुसले.
आय एस पी प्रेस पोस्ट ऑफिस भागात हा अतिक्रेकी हल्ला करण्यात आला होते. दंगा नियंत्रण पथक आणि बॉम्ब शोधक पथकाने अतिरेकी हल्ल्याचा परिसर सील करून जवानांनी संपूर्ण परिसराचा विळखा घातला. नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या कमांडो, बॉम्ब शोधक पथक, नाशिक रोड पोलिस, इंडिया सिक्युरिटी प्रेस चे सी आय एस एफ ने अतिरेक्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. श्वान पथक अल्फा यालाही पाचारण करण्यात आले. अतिरेकी हे सिक्युरिटी प्रेस मध्ये घुसण्याचा प्रतत्नात होते परंतु त्यांना त्या अगोदरच सिक्युरिटी प्रेस जवळ असलेल्या पोस्ट ऑफिसच्या परिसरात घेरण्यात यश आले.
पोस्ट ऑफिस भागात आतंकवादी लपून असल्याचे नक्की झाल्यानंतर संपूर्ण लक्ष त्या भागात केंद्रित करण्यात आले.अतिरेक्यांनी पोस्ट ऑफिस मधील कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले होते.अतिरेकी लपून बसलेल्या ठिकाणी झालेल्या जटापटीत जवानांनी अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात संयुक्त टीमला यश आले. ओलीस ठेवण्यात आलेल्या कर्मचाऱ्याला सुरक्षित सोडविण्यात आले. हल्ल्यात जखमी झालेल्या एका जवानाला आय एस पी डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून दवाखान्यात हलविले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रेस कामगार व नागरिकांमध्ये खळबळ उडाली परंतु सदर हल्ला हा मॉक ड्रिल असल्याचे घोषित झाल्यानंतर नागरिकांनी व प्रेस कामगारांनी सुटकेचा विश्वास सोडला. पोलीस आयुक्तालयाचे कमांडो, नाशिक रोड पोलिस, दंगा नियंत्रण पथक, बॉम्ब शोधक पथक आणि सिक्युरिटी प्रेसचे सीआयएसएफ यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोक ड्रिल घेण्यात आली. गुरुवारी 15 ऑगस्ट रोजी देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा होणार असल्याने या पार्श्वभूमीवर अतिरेकी हल्ला झाल्यास त्याकरिता हा मौकडरील करण्यात आले होते.मुख्य गेटवर दहशतवाद्यांचा हल्ला आणि ग्रेनेडची लॉबिंग आदी बाबी लक्षात घेऊन मोकद्रिल्ल घेण्यात आली होती.
पोलीस आयुक्तालयातील सुमारे 200 कर्मचारी व कमांडो त्याचप्रमाणे सीआयएसएफ चे जवान, बॉम्ब शोधक पथक, दंगा नियंत्रण पथकाने ही कामगिरी केली. यावेळी इंडिया सिक्युरिटी प्रेस सी आय एस एफ चे वरिष्ठ कमांडंट चंदनशिवे अमोल, डेप्युटी कमांडंट रवी गुप्ता, असिस्टंट कमांडंट मुकेश चतुर्वेदी, असिस्टंट कमांडंट प्रशांत सिंह, निरीक्षक एस के गुप्ता, कीर्ती कुमार, एस के बॅनर्जी, डी पी यादव, उपनिरीक्षक निर्मित कंबोज व संतोष गावंडे, CISF शक्ती-80 महाराष्ट्र पोलीस-50 ISP व्यवस्थापन टीम-05 ,श्वान पथकाच्या पोलिस निरीक्षक कीर्ति पाटील
संजय गामने, भूषण खैरनार, अनिल केदारे, चौरे पंडित, अजय बाविस्कर, रोहित धटिंगण, रुधिर शेख, फिरोज मुलाणी, राघवेंद्र प्रताप सिंह
नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयाचे एटीबी पथकाचे पोलीस निरीक्षक श्री चिंतामण, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक माळी, विशाल साळुंके, दहा पोलीस अंमलदार क्यू आर टी पथकाचे पोलिस उप निरीक्षक सोनवणे व 16 अंमलदार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.