परिमंडळ-२ कार्यक्षेत्रात कोम्बिंग ऑपरेशन…..
काही दिवसात साजरा होणारा छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी व्हावी नाशिक पोलिसांतर्फे शिवजयंतीच्या पार्श्वभुमीवर कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्ड वरील गुन्हेगार तसेच भारतीय हत्यार कायदयान्वये गुन्हे दाखल असलेले गुन्हेगार, अवैध दारु विक्री करणारे इसम, गुन्हयातील फरारी आरोपीतांना अटक करणे, टवाळखोरांवर कारवाई करण्यासाठी परिमंडळ-२ कार्यक्षेत्रात १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेपासून रात्री १० पर्यंत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यांत आले.
सदरचे कोम्बिंग ऑपरेशन करीता पोलिस उप आयुक्त श्रीमती मोनिका नं. राऊत, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, यांनी कोम्बिगं ऑपरेशन राबवून कारवाई करून गुन्हेगारांचे रेकॉर्ड तपासून कारवाई करण्यात आली. शरिरा विरुध्दचे गुन्हेगार, तडीपार तसेच घातक हत्यारे, अग्निशस्त्र बाळगून गुन्हे करणारे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून दहशत निर्माण करणारे गुन्हेगारांना अचानकपणे कोम्बिंग, ऑलआउट, नाकाबंदी, इत्यादी कारवाईत चेक करुन, घडझडत्या घेवून तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करुन गंभीर गुन्हे उघडकीस आणून अटक करण्याची कारवाई नियमित सुरु राहणार असल्याचे पोलिस उप आयुक्त श्रीमती मोनिका राऊत यांनी सांगितले आहे.