HomeUncategorizedदरोडा टाकण्याच्या उद्देशाने असलेल्या आरोपींना पंचवटी पोलीसांनी केली अटक..... पंचवटी पोलीस ठाणे,...
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

दरोडा टाकण्याच्या उद्देशाने असलेल्या आरोपींना पंचवटी पोलीसांनी केली अटक….. पंचवटी पोलीस ठाणे, नाशिक शहर गुन्हे शोध पथकाची कामगिरी…….

दरोडा टाकण्याच्या उद्देशाने असलेल्या आरोपींना पंचवटी पोलीसांनी केली अटक…..
पंचवटी पोलीस ठाणे, नाशिक शहर गुन्हे शोध पथकाची कामगिरी…….

नाशिक शहरात सतत च्या सुरू असलेल्या गुन्ह्यांवर आळा करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून गुन्हेगारांची आता गय नाही असे ठरवून मैदानात उतरले आहेत. २६ ऑगस्ट रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार रात्री 10 वाजेच्य सुमारास कुमावतनगर पाटाच्या परिसरात काही इसम हातात कोयता घेवुन असल्याची माहिती मिळाली. तात्काळ पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकसह पिटर मोबाईलवर पोलिस उप निरीक्षक माळी तसेच सिआर मोबाईल खाना करून मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी पोहोचले. पोलिसांना पाहताच दडून बसलेले ५ जण हे त्यांचे जवळ असलेल्या मोटार सायकल ने पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले, त्याचा पाठलाग करून एका मोटार सायकल वर स्वार ३ लोकांना त्यांच्या मोटारसायकलसह पकडले. सागर हेमंत सोनार, वय १९ वर्षे, व्यव. शिक्षण, राह. रू.नं. ८५५, अंबड लिंक रोड, चुंचाळे शिवार, म्हाडा कॉलनी, अंबड, नाशिक, तुषार बाळु खैरनार, वय २३ वर्षे, व्यव. शिक्षण, राह. पाथर्डी फाटा, आनंदनगर, व्दारका रेसिडेन्सी फ्लॅट नं. ४, इंदिरानगर, नाशिक, अविष्कार रमेश घोरपडे, वय १९ वर्षे, व्यव. शिक्षण, राह. स्वतंत्र चौक, जिल्हापेठ, जळगाव, ता. जि. जळगाव या तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असता तिघांपैकी सागर हेमंत सोनार याच्याकडे कोयता, तुषार बाळू खैरनार याकडे लोखंडी रोड व अविष्कार रमेश घोरपडे याकडे दोरी व मिरची पुड मिळुन आली.

संशयीत आरोपी सागर हेमंत सोनार २६ जून रोजी के.टी. एच. एम. कॉलेज, गंगापुर रोड, येथे असतांना रूषिकेष गणेश परशे उर्फ रूषि बाबा, राह. कुमावतनगर, नाशिक याने त्याच्यासोबतच्या १५ ते २० मुलांसह गाठले व त्यास छोटा टिप्पर गँगच्या ओम्या खटकी उर्फ ओम प्रकाश पवार वय १९ वर्षे, याच्यासोबत का राहतोस अशी विचारणा करून त्यास लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व त्यास त्यांच्याकडील मोटारसायकलवर बळजबरीने बसवुन कुमावतनगर जॉगिंग ट्रॅक येथे आनुण मारहाण करून धमकावून सोडुन दिले होते. त्यानंतर ४ दिवसापुर्वी रूषिकेष गणेश परशे उर्फ रूषि बाबा याने त्यास मोबाईलवरून कॉल करून तु पुन्हा ओम्या खटकी याच्यासोबत राहतो म्हणुन तुला बघुन घेतो. असे म्हणुन शिवीगाळ व दमदाटी केली होती. ओम्या खटकी उर्फ ओम प्रकाश पवार हा टिप्पर गँगचा सुत्रधार गौरव उमेश पाटील याचा प्रमुख हस्तक असून ओम्या खटकी हा नुकताच २४ ऑगस्ट रोजी अंबड पोलीस ठाण्यात भादविक ३०२ प्रमाणे दाखल गुन्हयातील प्रमुख आरोपी असून त्यापासून प्रेरणा घेवून संशयीत आरोपी सागर हेमंत सोनार याने आपल्यासोबतचे इतर ४ जणांना घेवुन त्यांच्याकडील मोटारसायकलने रूषि गणेश परशे उर्फ रूषि बाबा यास व त्याचे एका मित्रास लुटमार करून जिवे ठार मारण्याच्या उददेशाने कुमावतनगर पाटाच्या परिसरात हत्यार कोयता व इतर हत्यारसह जमले होते. परंतु पोलिसांना अगोदरच माहिती मिळाल्याने त्यांचा हा डाव फासला आणि पोलिसांनी पाठलाग करून ५ पैकी तिघांना हत्यार व मोटार सायकलसह ताब्यात घेतले. यामुळे पंचवटी पोलीस ठाणेच्या सर्तकतेमुळे हददीत घडणा-या लुटमारीच्या तसेच खुनाच्या प्रकारास प्रतिबंधित केला असुन, सदर आरोपींवर भादंविक. ३९९, ४०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे, त्यातील ३ आरोपी अटक आहेत, उर्वरित अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेले दोन आरोपींचा शोध सुरू आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दिनेश खैरनार करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त, नितीन जाधव, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलिस निरीक्षक बगाडे, पोलीस निरीक्षक सपकाळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक मिथुन परदेशी, सहायक पोलिस निरीक्षक दिनेश खैरनार पोलिस उप निरीक्षक योगेश माळी, सहायक पोलिस उप निरीक्षक अशोक काकड, सहायक पोलिस उप निरीक्षक माळोदे, शिंदे, बाविसकर, पचलोरे, परदेशी, मोकळ, महाले, ठोबरे तसेच गुन्हे शाखेकडील पोना / रोहीत भावले अशांनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments