ताज्या बातम्या धार्मिक

शनिवारी ‘पंथ के महान कीर्तन’चे आयोजन…..अमनदीप सिंहजी यांचे हिंदीतून सत्संग प्रवचन…..

शनिवारी ‘पंथ के महान कीर्तन’चे आयोजन…..अमनदीप सिंहजी यांचे हिंदीतून सत्संग प्रवचन…..

नाशिक सिंधी पंचायतीतर्फे रामिबाई भवन येथे धार्मिक कार्यक्रम तसेच गुरू का लंगरचेही आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक सिंधी पंचायतीतर्फे शनिवार २४ ऑक्टोबर रोजी ‘पंथ के महान कीर्तन’ या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात कथा व कीर्तन प्रवचनकार अमनदीप सिंहजी यांचे हिंदी भाषेतून सत्संग प्रवचन होणार आहे.

हा धार्मिक कार्यक्रम सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत पूज्य झुलेलाल मंदिर, रामिबाई भवन, तपोवन लिंक रोड, काठे गल्ली, नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमातून भाविकांना आध्यात्मिक विचार, भक्तिरस आणि सत्संगाचा लाभ घेता येणार आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी भाविकांसाठी ‘गुरू का लंगर’ याचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक सिंधी पंचायतीतर्फे आयोजित या कार्यक्रमाला समाजातील नागरिक व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *