ताज्या बातम्या नाशिक

नाशिक डिस्ट्रिक्ट सिंधी पंचायत फेडरेशनची नवीन कार्यकारिणी जाहीर…..वासुदेव लालवाणी अध्यक्षपदी….शरद पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर पुढील दोन वर्षांसाठी सर्वानुमते निवड….

नाशिक डिस्ट्रिक्ट सिंधी पंचायत फेडरेशनची नवीन कार्यकारिणी जाहीर…..वासुदेव लालवाणी अध्यक्षपदी….शरद पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर पुढील दोन वर्षांसाठी सर्वानुमते निवड….

नाशिक डिस्ट्रिक्ट सिंधी पंचायत फेडरेशनची पुढील दोन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणी रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी शरद पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर सर्वानुमते जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी वासुदेव लालवाणी यांची, तर जनरल सेक्रेटरीपदी राजेश गोधवानी यांची निवड करण्यात आली.

 

नवीन कार्यकारिणीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून उद्धवदास बोदानी आणि कन्हैयालाल कालाणी यांचीचीफ पेट्रॉन म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच खजिनदारपदी प्रेम हरियाणी, उपाध्यक्षपदी नानक केसवानी, हरीश कटारिया, मनमाड येथील नरेश फुलवानी आणि मालेगाव चे संजय फतनानी यांची नियुक्ती करण्यात आली.
संयुक्त सचिवपदी दीपक तोलानी, तर संयुक्त खजिनदारपदी अमित तनी यांची निवड झाली आहे.
नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून सिंधी समाजाची एकजूट अधिक बळकट करणे, समाजाच्या विविध प्रश्नांवर काम करणे, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना चालना देणे आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नवीन कार्यकारिणीतील सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे समाजबांधवांकडून हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *