क्राईम ताज्या बातम्या

नाशिकरोडला युवकाकडून अमली पदार्थ जप्त….. नाशिकरोड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी……

 

नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळपट्टी रोड भगवती लॉन्स जेल रोड परिसरात राहणाऱ्या एका 30 वर्षीय संशयित इसमाकडून मोफेड्रोन सदृश अमली पदार्थ हस्तगत करण्यात नाशिक रोड पोलिसांना यश आल्याची माहिती परिमंडळ 2 च्या पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी नाशिक रोड पोलिस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.


सहायक आयुक्त डॉ सचिन बारी आणि नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयित तरुणाचे नाव सागर रामदास शिंदे वय 30 वर्ष व्यवसाय चालक राहणार पिंपळपट्टी रोड भगवती लॉन्स जेल रोड नाशिक असे असून त्याच्याकडून 32.150 ग्रॅम मोफेड्रोन सदृश्य अमली पदार्थ अंग झडती मध्ये मिळून आल्याने त्याच्या विरोधात नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या अमली पदार्थाचे अंदाजे किंमत ही जवळपास एक लाख सहा हजार पाचशे पन्नास रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.
दरम्यान नाशिक रोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रविण सुर्यवंशी हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *