जबरी चोरी करणारा आरोपी पोलीसांच्या जाळयात……भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी….
जबरी चोरी करणारा आरोपीला भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ०६ ऑक्टोबर रोजी सकाळी गणेश डांगळे, रा. निफाड हे संदर्भ हॉस्पीटल मधुन बाहेर चहा घेण्यासाठी पायी जात असतांना २० ते २२ वर्षे वयोगटातील ०३ जणांनी रिक्षाने येऊन एका इसमाने गणेश डांगळे यांना पकडुन ठेवले व दोघांनी पॅन्टचे खिशातील ३,०००/-रूपये किंमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन बळजबरीने चोरून नेले होते. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. वरिष्ठांच्या
मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपींचा तांत्रिक पध्दतीने व मानवी कौशल्याने तपास करून गुन्हा उघडकीस आणुन गुन्ह्यातील आरोपी संशयित अस्लम लतीफ खान, वय २१ वर्षे, रा. फकिरवाडी, दरबार रोड, नाईकवाडीपुरा, नाशिक यास तसेच ०२ विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेतले आहे. गुन्हयात जबरी चोरी झालेला ३,०००/-रूपये किंमतीचा ओपो कंपनीचा मोबाईल फोन व चोरी करण्याकरीता वापरलेली ५०,०००/- रूपये किंमतीचा ऑटोरिक्षा असा एकूण ५३,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत सपकाळे हे करीत आहेत
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख, पोलीस निरीक्षक विक्रम मोहीते, पोलीस निरीक्षक भद्रकाली पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार, सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत सपकाळे, सतिष साळुंके, कव्युम सैय्यद, अविनाश जुद्र, दयानंद सोनवणे, निलेश विखे, नारायण गवळी, विशाल गायकवाड आदींनी केली आहे .