बिटको महाविद्यालयात इ. ११ वी गुणवंतांचा सत्कार संपन्न …
नाशिकरोड गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात मार्च /एप्रिल २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या ई. ११ वी तील यशस्वी गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे यांच्या शुभ हस्ते पारितोषिक विजेत्यां विद्यार्थ्यांना पेढे, गुलाब पुष्प व गुणपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. सत्कारार्थी विद्यार्थ्यांनी आपल्या यशात पालक शिक्षक यांचे योगदान मोलाचे असल्याचे सांगितले .याप्रसंगी प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना मोबाईलच्या आहारी न जाता महत्त्वाच्या कामासाठीच वापर करा. मोबाईलच्या अतिवापराने रेडिएशनचा मेंदूवर परिणाम परिणाम होतो क्रियाशक्तीचा ऱ्हास होतो हे सांगून जीवनात कष्टाशिवाय पर्याय नाही. स्वतःचा स्वतःवर आत्मविश्वास ठेवा. संस्कृती मूल्य जपा. अधिक जोमाने अभ्यास करून आपले ध्येय साकार करा असे सांगितले. निकाल खालीलप्रमाणे
इ.११वी कला :-
प्रथम _कु. गायत्री प्रकाश वानखेडे ४७१/६००(७८. ५० %)
द्वितीय _कु. तपस्वी कमलाकर पगारे ४४६/६००(७४. ३३ %)
तृतीय _कु. प्रज्ञा सिद्धार्थ घोडेस्वार ४४५/६००(७४. १६ %)
इ.११वी वाणिज्य _
प्रथम – कु. साक्षी अनिल भाटिया ५५६/६००(९२.६६%)
द्वितीय _कु. मानसी सुनील दराडे ५४९/६००(९१.५०%)
तृतीय – अमन दशरथ गीते ५४४/६००(९०. ६६ %)
इ.११वी विज्ञान :_
प्रथम _ साहिल उत्तम सांगळे ५५६/६०० (९२. ६६%)
द्वितीय _कु. अंकिता दिलीप सातपुते ५४७/६०० (९१. १६ %)
तृतीय _कु. सिद्धी अजय गोडसे ५२७/ ६०० (८७. ८३ %)
इ.११ वी एच.एस .सी.व्होकेशनल :-
एम.एल.टी. _ कु. आलीना शकील शेख ३५७/६००(६० %)- (प्रथम )
यावेळी निकाल घोषित करताना उपप्राचार्या नेमाडे यांनी ११ वी विज्ञान शाखेचा निकाल ९८ % तर वाणिज्य शाखेचा ९७.६%, कला शाखेचा ९२.२६% तसेच एच. एस. व्ही. सी. चा निकाल १००% लागल्याचे सांगुन यथोचित मार्गदर्शन केले . याप्रसंगी डॉ. के. सी. टकले, पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे, सौं.राधा पाटील, मीनल पाटील, रागिणी भवर, शालिनी शेळके, मीना शिंदे, हर्षदा तांदळे, संजय परमसागर, निलेश वाणी, विद्यार्थी सभा कार्याध्यक्ष लक्ष्मण शेंडगे, सुहास माळवे यासह सत्कारार्थी विद्यार्थी,पालक व शिक्षक – शिक्षकेतर स्टाफ आदी उपस्थित होते.