मेडीक्लेम कंपन्यांकडून नागरिकांची पिळवणूक….. रुग्णांचे हाल…..
अनेकदा परिवारात आजारपण आले की संपूर्ण परिवार त्रासलेले असतात. आजारपणाला तोंड देता येईल म्हणून कष्टाचे पैसे अडीअडचणीत काम येण्यासाठी मेडीक्लेम कंपनी वाल्यांना देऊन मेडीक्लेम कंपनीकडून हॉस्पिटल मध्ये सहकार्य होईल या हेतूने सर्वसामान्य नागरिक पैसे भरतो पण अनेकदा मेडिक्लेम कंपनी एन वेळेत फाईल रजेक्ट करतात आणि रुग्णांचे हाल होतात आणि अडमीत झाल्यानंतर डिस्चार्ज घेताना पैशांसाठी धावपळ होती. नुकतेच एका डेंग्यू पेशंटला नाशिक येथील नामांकित हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांच्या सांगण्यानुसार हॉस्पिटल मध्ये आणले, तिथेही डॉक्टरांच्या सांगण्यानुसार शेवटी रुग्णाला दाखल करण्यात आले होते, पाच हजार रुपये रोख भरून मेडीक्लेम फॉर्म भरले, पहिल्या दिवशी ॲप्रोवल आले मात्र शेवटच्या दिवशी डिस्चार्ज घेताना मात्र क्लेम नाकारण्यात आले मग पहिल्या दिवशी क्लेम ॲप्रोवल का देण्यात आले. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार पेशंटला हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटल डॉक्टर मेडिक्लेम कंपन्यांकडून हॉस्पिटल बरोबर ठरवून रुग्णांची अवाजवी पिळवणूक केली जाते असे दिसून येते. लेब मधील रिपोर्ट्स, सी टी स्कॅन, एम आर आय आणि इतर प्रकारची बिले रोखीत आणि मेडीक्लेम या दोघांमध्ये रकमेत मोठा फरक असतो. तीन हजार रुपयांची सी टी स्कॅन मेडीक्लेम साठी अकरा हजार रुपये आकारले जातात. त्याच प्रकारे इतर ब्लड रिपोर्ट्स याकरिता असेच मोठ्या प्रमाणत अवाजवी रक्कम आकारली जातेच पण शेवटच्या क्षणी मेडीक्लेम कंपनीकडून क्लेम नाकारले जातात. अडचणीत मेडीक्लेम कंपनीच्या भरवशावर असताना शेवटच्या क्षणी नागरिकांनी पैसे आणायचे कुठून? हॉस्पिटल आणि मेडीक्लेम कंपन्यांचे लागेबांधे कुठेतरी थांबतील याकडे सरकारने लक्ष द्यावे. सरकारने नागरिकांना अशा प्रकारे त्रास आणि पिळवणूक होणार नाही यासाठी समिती नेमवून कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.