ताज्या बातम्या राजकारण

खासदार सुप्रिया सुळे यांनी जगदीश गोडसे यांना राखी बांधून दिल्या शुभेच्छा……

 

खासदार सुप्रिया सुळे यांनी जगदीश गोडसे यांना राखी बांधून दिल्या शुभेच्छा……

आंतरराष्ट्रीय कामगार नेते, नाशिक रोड प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस आणि विधानसभेचे इच्छुक उमेदवार जगदीश गोडसे यांनी आज नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. सुप्रिया सुळे यांनी त्यांना राखी बांधून विधानसभा निवडणुकीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

जगदीश गोडसे यांनी गेल्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी जगदीश गोडसे यांच्या घरी वास्तुशांती निमित्त भेट घेतली होती. त्यानंतर जगदीश गोडसे यांनी शरद पवार यांच्याशी सतत चांगला संपर्क ठेवला. शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनाशी निगडित क्रमांक असलेल्या नोटांची भेट दिली होती.


राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे उमेदवारी करण्याची तयारी गोडसे यांनी वर्षभरापासून सुरू केली आहे. नाशिक दौऱ्यावर आलेल्या सुप्रिया सुळे यांची त्यांनी शालिमार येथील गायकवाड वसतीगृह मध्ये भेट घेतली. यावेळी खासदार भास्करराव भगरे, कोंडाजी मामा आव्हाड, कॅप्टन कुणाल गायकवाड, प्रभाकर गायकवाड, सुधीर गायकवाड आदी उपस्थित होते. जगदीश गोडसे यांनी सुप्रिया सुळे यांना विधानसभा निवडणुकीचे प्रचार पत्रके दिली तसेच. मतदारसंघाची माहिती दिली. सुप्रिया सुळे यांनी देखील त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली आणि राखी बांधून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *