क्राईम ताज्या बातम्या

जबरी चोरी करणारा फरार आरोपी गुन्हे शाखा युनिट २ च्या ताब्यात

जबरी चोरी करणारा फरार आरोपी गुन्हे शाखा युनिट २ च्या ताब्यात……

 


जबरी चोरी व अपहरण मधील फरार आरोपी गुन्हेशाखा युनिट २ ने २४ तासाच्या आत ताब्यात घेतले आहे.
२४ एप्रिल रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल कलम ३६५, ३९२, ५०६, ३४ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना गुन्हयातील संशयित सलीम उर्फ मुलाख गयात्उधीन कुरेशौ क्य ४० वर्ष, रा. ए-१५, देवळाली मिडोज, देवळाली कॅम्प, नाशिक हा. विंचूर ता. निफाड, जि. नाशिक, येथे असल्याबाबतची माहिती परमेश्वर दराडे, स्वप्नील जुद्रे यांना मिळाली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर शिंदे, परमेश्वर दराडे, स्वप्नील मुंद्रे, संजय पोटीदे, विशाल कुंवर यांनी लागलीच संशयितास विंदुर औरंगाबाद रोड, येथुन गुन्हयात वापरलेली महिंद्रा कंपनीच्या यार क्रमांक एम एवं १२ एमपी ९२९१ सह ताब्यात घेवुन त्यास गुन्हयाचे पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलीस ठाण्यात हजर केले आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदिप कर्णिक पोलिस उप आयुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त सिताराम कोल्हे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर शिंदे, परमेश्वर दराडे, स्वप्नील मुंद्रे, संजय पोटीदे, विशाल कुंवर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *