करन्सी नोट प्रेस वर अतिरेकी हल्ल्याचा प्रयत्न…. संभाव्य अतिरेकी हल्ल्याच्या पा्श्वभूमीवर डेमो…..
नाशिकरोड येथील करन्सी नोट प्रेसवर बुधवारी अतिरेकी हल्ल्याचा प्रयत्न झाला. हल्ल्याची खबर मिळताच करन्सी नोट प्रेस ची सी आय एस एफ, नाशिक रोड पोलिस, बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. हल्ल्याची बातमी पसरताच प्रेस कामगार आणि नागरिकांमध्ये परिसरात एकच खळबळ उडाली आणि भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले. जेल रोडला सायंकाळी रस्त्यांवर वाहनांची वर्दळ असताना अचानक हा हल्ला झाल्याने प्रेसच्या बाजूचे महाजन डॉक्टर पासून जाणारी वाहतूक संपूर्णपणे रोखण्यात आली.
एकतर्फी रस्ता सुरू आल्याने दोन्ही दिशेने लांबच्या लांब वाहनांच्या रांगा लागल्या आणि वाहतूक खोळंबली. पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त सचिन बारी, उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर कदम आणि पोलिस कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले.
एन एस जी कमांडो आपल्या संपूर्ण ताफ्यासह परिसराचा ताबा घेतला. प्रेस समोर असलेल्या कॉर्पोरेट अनुसंधान आणि विकास केंद्र याठिकाणी एन एस जी कमांडो यांनी आपले तळ बनविले त्याठिकाणी संपूर्ण नियोजन करून अतिरेक्यांवर कशाप्रकारे हल्ला करायचे याबाबत नियोजन केले. परिसरात वाऱ्यासारखी प्रेस मध्ये अतिरेकी हल्ला झाल्याची खबर पसरली.
येणारे जाणारे वाहनधारकांना भीतीयुक्त उत्सुकता होती की एन एस जी कमांडो अतिरेक्यांना कंठस्नान घालतील. रात्री उशिरा पर्यंत ही कारवाई सुरू होती. संभाव्य अतिरकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एन एस जी तर्फे हा मॉक्लद्रिल्ल घेण्यात आले होते अशी माहिती पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.