भारतीय सिंधू सभा संपन्न….. ‘ओ मुहिंजो झुलेलाल’ कार्यक्रमाचे नियोजन…..
भारतीय सिंधू सभेची नाशिक कार्यकारिणीची बैठक रविवारी 21 डिसेंबर रोजी नाशिक पुणे महामार्गावरील हॉटेल नाशिक क्लब याठिकाणी संपन्न झाली. शहराध्यक्ष किशन अडवाणी यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक पार पडली. रविवार 14 जानेवारी 2026 रोजी ‘ओ मुहिंजो झुलेलाल’ या विशेष नाटकाचे आयोजन करण्यात आले असून त्या नियोजनासंदर्भात कार्यकर्त्यांची आणि वर्किंग कमिटीची बैठक पार पडली.

कार्यक्रम व्यवस्थिपणे पार पडावे यासाठी बैठक घेऊन चर्चा विनिमय होऊन अनेक सूचना मांडण्यात आल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश गोडवाणी, शहराध्यक्ष किशन अडवाणी, दयावान बाबा अशोक पंजाबी, महिला अध्यक्ष रितिका कलानी, सेक्रेटरी अमित तानी, दीपक तोलानी, हेमंत ताराणी, हरेश कटारिया, सन्नी दादानी, मुकेश वेलेचा, सेवकराम दर्डा,लक्ष्मीदास निहलानी, प्रिया साधवानी, दीपिका चावला, विना चावला, आदी उपस्थित होते. भारतीय सिंधू सभा या सामाजिक संस्थेशी जुळवून घेऊन समाजवसेवेत स्वतःला वाहून घ्यावे असे आवाहन शहराध्यक्ष किशन अडवाणी यांनी केले आहे.

