Homeक्राईमउपनगर गुन्हयातील फरार बहेनवाल व त्याचे तीन साथीदार दिल्लीतून गुंडा विरोधी...
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

उपनगर गुन्हयातील फरार बहेनवाल व त्याचे तीन साथीदार दिल्लीतून गुंडा विरोधी पथकाने केले जेरबंद

दिनांक १६ फेब्रुवारी रोजी उपनगर पोलीस ठाणे हद्यीत धर्मनाथ अपार्टमेंट समोर, सम्राट चौक, भिम नगर येथे फिर्यादी मयुर विजय रोहम हे उभे असतांना पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार मधुन आलेले विजय बहेनवाल उर्फ छंगा, राहुल उज्जैनवाल, गणेश सोनवणे व इतरांनी मयूर रोहम याला पकडुन मागील भांडणाची कुरापत काढुन मयुर बेद व रोहित महाले यांचे विषयी विचारपुस करत मयूर याला हाताच्या बुक्क्याने पोटात व छातीत मारले तसेच हातातील धारदार चॉपरने जीव घेण्याच्या उद्देशाने वार केले म्हणुन मयुर विजय रोहम यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलीस ठाण्यात भादवी कलम ३०७,१४३,१४७,१४८,१४९,३२३,५०४, ५०६ आर्म अॅक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाले पासुन सर्व आरोपी फरार होते.

सदर गुन्हयातीलआरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने त्यांचा शोध घेण्याकरिता पोलीस आयुक्त संदीप कर्णीक,पोलीस उप आयुक्त प्रशांत बच्छाव व सहायक पोलीस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे यांनी गुंडा विरोधी पथक यांना आदेशीत दिले होते

त्याअनुषंगाने गुंडा विरोधी पथकाने गुन्हयातील सर्व आरोपींना तांत्रिक व मानवी कौशल्य वापरुन आरोपी यांची माहिती काढली की, आरोपी विजय बहेनवाल उर्फ छंगा, राहुल उज्जैनवाल, गणेश सोनवणे व इतर आरोपी हे आपले अस्तित्व लपवुन राज्य राजस्थान, हरियाणा व दिल्ली येथे पळुन गेले आहे. त्यानुसार सदरची माहिती वरिष्ठ यांना देवुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथक प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते व पोलीस अंमलदार विजय सुर्यवंशी, डी. के. पवार, प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत असे दिनांक २० फेब्रुवारी रोजी राज्य राजस्थान, हरियाणा व दिल्ली येथे रवाना झाले होते.

आरोपींचा शोध घेत असतांना दोन दिवसांनी आरोपी हे राजस्थान, हरियाणा येथुन दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन जवळ असल्याची माहिती मिळाल्याने गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी व अंमलदार यांनी दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन परिसरात शोध घेतला असता आरोपी हे रेल्वे स्टेशनचे बाहेर लोकांच्या गर्दीमध्ये दिसुन आल्याने संशयीत आरोपी विजय उर्फ छंगा सरजीत बहेनवाल राहुल अजय उज्जैनवाल प्रदिप उर्फ गणेश विठ्ठल काळे ,गणेश उर्फ गौख सुनिल सोनवणे हे लोकांच्या गर्दीमधुन पळुन जावु नये म्हणुन गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी व अंमलदार यांनी सापळा रचुन शिताफीने आरोपींना ताब्यात घेतले. ताब्यातील आरोपीतांना दिल्ली येथुन नाशिक येथे आणुन पुढील तपासासाठी उपनगर पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, पोलीस उप आयुक्त प्रशांत बच्छाव
सिताराम कोल्हे, यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, विजय सुर्यवंशी, डी.के. पवार, राजेश सावकार, सुनिल आडके, प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, गणेश नागरे, नितीन गौतम, निवृत्ती माळी, महिला पोलीस अंमलदार सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या कामगिरी केली

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments