नाशिकरोडला मिळालेल्या बेवारस मृतदेहाचे अनैतिक संबंधातून खून झाल्याचे संशय……. दोन संशयित नाशिकरोड पोलीसांनी घेतले ताब्यात
नाशिकरोड उपनगर हद्दीत टकळी रोडवर असलेल्या महानगर पालिकेच्या मलनिःसारण केंद्रा जवळ एका ३० वर्षीय इसमाचा मृतदेह सोमवारी दुपारी मिळून आला होता. युवकाचा मृतदेह गेल्या आठ दिवसांपासून तिथे होता असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. पंचक गावातील सोमनाथ बोराडे हे गायी म्हशी चरण्यासाठी त्या भागात गेले असता त्यांना वास येऊ लागल्याने नाशिकरोड पोलिसांना कळविले. माहिती मिळताच नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास वांजळे, सहायक पोलिस निरीक्षक हेमंत फड अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले.
मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख करने कठीण होत होते. आठ दिवसांपूर्वी नाशिकरोड पोलिस ठाण्यात पंचक येथील एक युवक हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मृतदेह त्याच व्यक्तीचा असावा म्हणून त्यांच्या घरच्यांना बोलवण्यात आले पण मृतदेह कुजलेले असल्याने महिलेने मृतदेह तो नसल्याचे सांगितले. पोलिसांना संशय आल्याने तपासाची चक्रे फिरवून केतन कोटमे आणि चेतन मोरे या दोन संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केले आता दोघांनी मिळून खून केल्याचे कबूल केले. ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड वय ३० राहणार पंचक असे या मयात व्यक्तीचे नाव आहे. दोघा संशयितांनी खून करून मृतदेह मलनिःसारण केंद्राजवळ टाकून दिल्याचे प्राथमिक माहिती आहे.
या युवकाचा अखेर खून झाल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून आणखी काही जण या खून प्रकरणात असल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त आनंद वाघ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास वांजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत. अवघ्या काही तासातच बेवारस मृतदेहाचे खून झाल्याचा उलगडा केल्याने वरिष्ठांनी कौतुक केले आहे