मध्यप्रदेश महाराष्ट्र-छत्तीसगड झोनचे पूर्वाश्रमीचे प्रवक्ते विकास उर्फ अनंत नागपुरे यांच्यासह १४ स्त्री व पुरुष नक्षलवाद्यांनी गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. या नक्षलवाद्यांची कायदेशिर आत्मसमर्पणाची प्रक्रिया शुक्रवारी (दि.१७) जिल्हाधिकारी मंगेश गोंदावले यांच्या उपस्थित पार पडली. गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी १५ पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांचा कायदेशीररित्या समर्पणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचे पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात […]
Month: April 2026
चार शेकरूंसह उडणाऱ्या खारीची शिकार; बारा आरोपी अटकेत
: राज्यात दुर्मीळ असलेला राज्यप्राणी शेकरू, उडणारी खार व राज्यपक्षी हारावतासह दयाळ पक्ष्याची शिकार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश आलापल्ली वन विभागाने केला. रविवार, १९ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास जंगलात लपून बसलेल्या १२ शिकाऱ्यांना वनविभागाच्या पथकाने थरारक पाठलाग करून रंगेहाथ पकडले. आलापल्ली वन विभागाचे पथक गस्तीवर असताना शिकाऱ्यांची टोळी जंगलात लपून असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वन विभागाच्या […]
परतवाडा व्हिडिओ कांड : अल्पवयीन पीडितेचे बयाण नोंदवले, पण पोलिसांकडून कमालीची गोपनीयता !
संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या परतवाडा येथील लैंगिक अत्याचार, आक्षेपार्ह व्हिडीओ चित्रीकरण ते व्हिडीओ, फोटो सोशल व्हायरल केल्याच्या गंभीर प्रकरणात शनिवारी एका १५ वर्षीय पीडितेचे बयाण नोंदवण्यात आले. मात्र, या बयाणात पीडितेने नेमकी काय माहिती दिली आणि तिच्या बयाणानंतर पोलिस आता कोणती भूमिका घेणार, याबाबत रविवारी दिवसभर प्रशासनाने प्रचंड गोपनीयता बाळगली. १३ एप्रिल रोजी गुन्हा […]
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
उष्णतेच्या लाटेने विदर्भ होरपळून निघत असून रविवारी तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचला. देशात रविवारी सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानअकोला आणि वर्धा येथे नोंदविण्यात आले. विदर्भातील सर्व शहरांचे तापमान ४१ अंशांच्या पुढे गेले असून नागपूर व अमरावती येथेही तापमान ४४ अंशांच्या वर नोंदविण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे आणि तापमानात सातत्याने […]
परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
हिंगोली/परभणी/नांदेड: मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांना आज, शनिवारी (दि. ११) सकाळी ८:४५ ते ८:४६ च्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. हा धक्का ४.७ रिश्टर स्केल असल्याची माहिती आहे. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली शहर, वसमत, औंढा आणि कळमनुरी तालुक्यात धक्के बसताच नागरिक घराबाहेर पडले. त्यानंतर लगेचच परभणी शहर व जिल्ह्याच्या काही भागांत आणि नांदेड जिल्ह्यातही […]
कारसह साडेआठ लाखांचा गुटखा पकडला; एकाला अटक
गुटख्याची चाेरट्या मार्गाने वाहतूक करणाऱ्या एकाला तब्बल ८ लाख ५९ हजार ५६० रुपयांच्या मुद्देमालासह पकडण्यात आले. ही कारवाई विशेष पाेलिस पथकाने कासार शिरसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत केली. याबाबत कासार शिरसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी सांगितले की, शनिवार, १८ एप्रिल रोजी सकाळी ९:४५ वाजण्याच्या सुमारास पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाला एका पांढऱ्या रंगाच्या […]
गर्भपातानंतर रुग्णालयात धाव, डॉक्टरांच्या तत्परतेमुळे बालविवाहाचे क्रूर सत्य समोर; ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा
पोटात दुखू लागल्याने आणि अतिरक्तस्राव होत असल्याने सोलापूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या एका अल्पवयीन विवाहितेच्या उपचारादरम्यान बालविवाहाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयात कागदपत्रे तपासली असता पीडितेचे वय उघड झाले आणि तेथूनच कायद्याचा बडगा उगारला गेला. या प्रकरणी पतीसह दोन्ही कुटुंबांतील पाच जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा व ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा नोंदवून तो केज पोलिसांकडे […]
परभणीत शिर्डी एक्सप्रेसवर दरोडा; सिग्नलची केबल कापून रेल्वे रोखली, महिलांचे दागिने ओरबाडले
मानवत (जि.परभणी) :परभणी-मनमाड रेल्वे मार्गावरील मानवत रोड रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी सिग्नल यंत्रणेत बिघाड करून साईनगर शिर्डी एक्सप्रेस (रेल्वे क्र. १७२०६) रोखली. रेल्वे थांबताच चोरट्यांनी जनरल डबा आणि आरक्षित डब्यात प्रवेश करून दोन महिला प्रवाशांचे सोन्याचे दागिने लंपास केले. (रेल्वे पोलिसांचे म्हणणे की चोरट्यांनी खालूनच खिडकीद्वारे चोरी केली. मात्र, रेल्वे प्लॅटफॉर्मवर आली […]
महामानवास अभिवादन : मध्यरात्री जयभीमच्या जयघोषाने नांदेड दणाणले…
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी मध्यरात्री नांदेड शहरात उत्साहाचे वातावरण होते. सामाजिक समता आणि न्याय या मूल्यांचा जागर करत भीम अनुयायांनी रेल्वेस्थानकासमोरील महामानवाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी आणि ‘जय भीम’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. ज्ञानाचा प्रकाश जनमानसात पोहचवणाऱ्या बाबासाहेबांच्या स्मृतीला यावेळी विनम्र अभिवादन करण्यात […]
महिला गुत्तेदाराला ६ लाखांच्या खंडणीसाठी राॅड, काठीने मारहाण, ६ जणांविराेधात गुन्हा दाखल
सोलापूर-धुळे महामार्गालगत शासकीय वनात वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम सुरू असताना, महिला गुत्तेदाराकडे ६ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.पाेलिसांनी सांगितले, शोभा धोंडीराम जाधव (रा. परांडा) या महिला गुत्तेदार वनीकरण विभागात काम करत असताना, आरोपी राजू माने व पांडुरंग माने यांनी कामाच्या बदल्यात ६ लाख रुपयांची मागणी […]










