क्राईम ताज्या बातम्या

गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगणारा अटकेत……गुंडा विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी……

गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगणारा अटकेत……गुंडा विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी……



‎नाशिक शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने नांदूर नाका परिसरातूनअवैध शस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला अटक करून त्याच्याकडून गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. १६ जून २०२६ रोजी नांदूर नाका परिसरात एक जण गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती राजेश राठोड यांना मिळाली. या माहितीच्या आधारे प्रभारी अधिकारी संदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, राजेश राठोड, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत व राकेश राऊत यांच्या पथकाने नांदूर नाका परिसरात सापळा रचून हॉटेल राजगड येथील पार्किंगमध्ये संशयित सचिन सिद्धेश्वर दवंडे याला शिताफीने ताब्यात घेतले.
‎त्याच्या कमरेला एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस आढळून आल्याने आरोपीविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
‎सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, पोलीस उप आयुक्त किरणकुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी संदीप पवार तसेच विजय सूर्यवंशी, अविनाश देवरे, प्रदीप ठाकरे, सुनील आडके, राजेश राठोड, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राकेश राऊत, कल्पेश जाधव व सुनीता कवडे यांनी संयुक्तरीत्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *