मानवत (जि.परभणी) :परभणी-मनमाड रेल्वे मार्गावरील मानवत रोड रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी सिग्नल यंत्रणेत बिघाड करून साईनगर शिर्डी एक्सप्रेस (रेल्वे क्र. १७२०६) रोखली. रेल्वे थांबताच चोरट्यांनी जनरल डबा आणि आरक्षित डब्यात प्रवेश करून दोन महिला प्रवाशांचे सोन्याचे दागिने लंपास केले. (रेल्वे पोलिसांचे म्हणणे की चोरट्यांनी खालूनच खिडकीद्वारे चोरी केली. मात्र, रेल्वे प्लॅटफॉर्मवर आली नसल्याने रेल्वे रुळापासून त्यांचे हात प्रवाशांपर्यंत पोहोचणे शक्य नाही). या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सिग्नलशी केली छेडछाड
साईनगर शिर्डी एक्सप्रेसला मानवतरोड येथे थांबा नाही. ही गाडी पहाटे २.५५ च्या सुमारास स्थानकात येण्यापूर्वीच ज्ञात चोरट्यांनी सिग्नल युनिट एस– १ ए ची केबल कापून सिग्नल यंत्रणा निकामी केली. चालकाला होम सिग्नल डेंजर दिसल्याने त्याने खबरदारी म्हणून गाडी प्लॅटफॉर्मच्या काही अंतरावरच थांबवली. याच संधीचा फायदा घेत दरोडेखोरांनी डब्यांवर हल्ला चढवला.

आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने ब्लु स्टार न्युज नाशिक आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.
