अकोला

अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा

उष्णतेच्या लाटेने विदर्भ होरपळून निघत असून रविवारी तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचला. देशात रविवारी सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानअकोला आणि वर्धा येथे नोंदविण्यात आले. विदर्भातील सर्व शहरांचे तापमान ४१ अंशांच्या पुढे गेले असून नागपूर व अमरावती येथेही तापमान ४४ अंशांच्या वर नोंदविण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे आणि तापमानात सातत्याने वाढ होत आहे. शनिवारी काही भागात ढगाळ वातावरणामुळे तापमानात किंचित घट झाली होती; मात्र त्यानंतर पुन्हा तापमानात मोठी वाढ झाली. अकोल्याचे तापमान एका दिवसात १.७ अंशांनी वाढले. रविवारी पुन्हा एकदा देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भातील अकोला व वर्धा येथे झाली. यंदाच्या उन्हाळ्यात प्रथमच तापमान ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *